*कोंकण Express*
*कणकवली शहरातील प्राथमिक शाळांना विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचा पायाभूत ज्ञानाला आधार*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला नेहमी सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबविणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य प्रशाला आहे या वर्षी कणकवली शहरातील सहा प्राथमिक शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेत जाऊन इयत्ता पाहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना चित्रकला या विषयांचे मूलभूत ज्ञानांचे मार्गदर्शन श्री प्रसाद राणे सरांनी केले त्यांच्या मार्गदर्शनांने प्राथमिक स्तरातील विद्यार्थी भारावून गेले कारण प्राथमिक शाळांमधून स्पेशल विषय शिकविण्याची सोय नसते विद्यार्थ्यांना चित्रकला या विषयांचे तोकडे ज्ञान असते हाच गुण हेरून मुख्याध्यापक श्री पीजे कांबळे सर व सहकारी शिक्षक यांच्या समविचाराने प्राथमिक शाळांमधून पायाभूत ज्ञान कौशल्यांचा प्रसार करावा आणि विद्यार्थ्यांना चित्रकलेची अभिरूची वृद्धिंगत करावी हाच ध्यास घेऊन मार्गदर्शन वर्गांचे नियोजन केले . गेले पंधरा दिवस विद्यामंदिर प्रशालेचे कलाशिक्षक श्री राणे सर यांनी मार्गदर्शन केले नंतर सर्व प्राथमिक शाळांच्या चित्रकला स्पर्धा आयोजित करून उत्तम कलाकारांचा शोध घेतला यासाठी कणकवली शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि सहकारी शिक्षक यांनी पाठींबा दिला . स्पर्धा यशस्वी रितीने झाल्यानंतर बुधवार दिनांक २७ मार्च रोजी बक्षिस वितरणांचा समारंभ आयोजित केला गेला या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय श्री विजयकुमार वळंजू साहेब उपस्थित होते तसेच सर्व शाळांचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते . यावेळी मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर यांनी शाळा आणि समाज यांचा समन्वय साधल्यावर उत्कृष्टतेकडे वाटचाल कशी होते या विषयी प्रबोधन करून परिसरातील प्राथमिक शाळांचा देखिल शैक्षक दर्जा उंचावला पाहिजे यासाठी माध्यमिक शाळा मधिल मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांनी मूलभूत ज्ञान बालकांपर्यंत पोहचविले तरच प्राथमिक शाळा बलशाली बनतील असा विचार मांडला श्री राणे सरांनी कलेची साधना जीवन जगण्याचे कौशल्ये बनते या विषयी मार्गदर्शन केले श्री वनवे सरांनी विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत विविध उपक्रम कसे राबविले जातात यांचे प्रबोधन केले . अध्यक्षस्थानांचे भाषण करतांना संस्थेचे सचिव श्री वळंजू साहेब यांनी प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शिक्षणांच्या सुविधा या विषयी मार्गदर्शन केले त्यांच्या शुभहस्ते सर्व शाळांना बक्षिसे दिली . सूत्रसंचालन श्री शेळके जे जे सर यांनी केले आभार सौ शिरसाट मॅडम यांनी मांडले यावेळी विद्यामंदिरचे सर्व शिक्षक प्राथमिक शाळांचे विद्यार्थी व शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .