मुलींनी आपली लाईफस्टाईल योग्य प्रकारे राखल्यास शारिरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम राहतील: डाॅ.शमिता बिरमोळे

मुलींनी आपली लाईफस्टाईल योग्य प्रकारे राखल्यास शारिरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम राहतील: डाॅ.शमिता बिरमोळे

*कोंकण Express*

*मुलींनी आपली लाईफस्टाईल योग्य प्रकारे राखल्यास शारिरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम राहतील: डाॅ.शमिता बिरमोळे*

*मुलींच्या व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमात केले प्रतीपादन*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व शिक्षण विभाग पंचायत समिती कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरी मेळावा विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील शिक्षण प्रसारक मंडळाच्या एचपीसीएल हॉलमध्ये बुधवार दिनांक 27 मार्च 2024 रोजी आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रिया सावंत मॅडम यांनी केले कार्यक्रमाची भूमिका या ठिकाणी त्यांनी स्पष्ट मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पनां मलये मॅडमनी केले. पाहुण्यांचा परिचय सौ वृषाली जाधव मॅडमांनी करून दिला.यावेळी कार्यक्रमासाठी मार्गदर्शक डॉक्टर शमिता बिरमोळे मॅडम लाभले त्यांनी मुलींचे व्यक्तिमत्व मासिक पाळी ,मुलींच्या व्यवस्थापन नियोजन ,मुलींचे जीवन शिक्षण ही काळाची गरज आहे तुम्ही तुमची लाईफस्टाईल तुम्ही योग्य प्रकारे राखली तर तुम्ही शारीरिक मानसिक दृष्ट्या सक्षम राहाल चांगल्या आरोग्यदायी सवय तुम्हाला सशक्त बनवतात भावी काळात माता बनण्यासाठी तसेच आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही शारीरिक मानसिक दृष्ट्या सुदृढ असणे गरजेचे आहे याविषयी सर्व मोलाचं मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय विश्वविद्यालयाच्या ब्रह्मकुमारी संध्या दीदी आणि पल्लवी दीदी या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्यांनी अध्यात्मिक चे महत्व आणि मनाचे एकाग्रता यासाठी ध्यानधारणा करणे किती काळाची गरज आहे याबद्दल मोलाचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे नियोजन पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी माननीय मांजरेकर मॅडम यांनी व विद्यामंदिर च्या सौ शिरसाठ मॅडम व मुख्याध्यापक कांबळे पी. जे सर यांनी केले या कार्यक्रम प्रसंगी विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थिनी, एसएमएस स्कूल कणकवलीच्या विद्यार्थिनी, जिल्हा परिषद शाळा क्रमांक 3 च्या विद्यार्थीनी, जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1च्या विद्यार्थीनी आणि विद्या मंदिर इंग्लिश मीडियम चे विद्यार्थीनी शाळा क्रमांक 5 च्या विद्यार्थीनी व त्यांचे शिक्षक उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या शंका समाधानाना यावेळी डॉक्टर बिरमोळे मॅडम यांनी उत्तरे दिली विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यामंदिर हायस्कूलच्या सौ संगीता साटम मॅडम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!