*कोकण Express*
*जिल्ह्यात होणाऱ्या शासकीय महाविद्यालयासाठी ५२४ पदे मंजूर…*
*वेतन अनुदानासाठी ११८ कोटीची तरतूद…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या शासकीय महाविद्यालयासाठी वर्ग १ ते वर्ग ४ ची ५२४ पदांना आज मंजूरी देण्यात आली. त्यासाठी ११८.५५ कोटीच्या वेतन अनुदानाला मंजुरी देण्यात आली. याबाबतचा शासन आदेश आज जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी शासकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मान्यतेच्या दृष्टीने पुढेही शासनाकडून असेच तत्पर निर्णय अपेक्षित आहेत. यात जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय शिक्षण विभागास हस्तांतरण आणि वसतीगृह तसेच इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. त्यादृष्टीने लोकप्रतिनिधी प्रयत्न करावेत,अशी मागणी आहे.जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय व्हावे यासाठी जनरेटा आंदोलन करण्यात आले होते. याला आता जिल्ह्यातील नेतृत्वाच्या पाठपुराव्याची गरज आहे. मुख्यमंत्री सकारात्मक असल्याने, प्रत्यक्षात स्वरूप प्राप्त होत आहे.