कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांना दिल्या शुभेच्छा

कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांना दिल्या शुभेच्छा

*कोंकण Express*

*कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांना दिल्या शुभेच्छा*

*कणकवली, माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर , माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते संजय बाबी मालंडकर यांच्या हस्ते बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांना पुष्पगुच्छ देऊन ५७ व्या वाढदिवस वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या,

*यावेळी माऊली मित्र मंडळाचे उपाध्यक्ष अविनाश गावडे, सुभाष उबाळे, भगवान कासले, व्यापारी मित्र मंडळाचे प्रभाकर कदम, निलेश निखार्गे, बाबुराव घाडीगावकर, प्रसाद पाताडे, प्रसाद उगवेकर, योगेश पवार, बाजारपेठ मित्र मंडळाचे ( अप्पासाहेब पटवर्धन चौक) बाळा शेट बाणे उपस्थित होते,

*यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर व, सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर यांनी अजय कुमार सर्वगौड यांना शुभेच्छा दिल्या, आणि सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत गणपती साना येथे पुलाचे काम सुरू केले, त्याबद्दल हि आभार व्यक्त केले,

*परंतु हे काम सुरू करताना , पाणी अडविण्यासाठी घातलेला मातीचा बंधारा हटविले मुळे, आजच्या घडीला गणपती साना येथील नदीपात्रात पाणी नसल्याने, पुन्हा नव्याने मातीचा बंधारा घालून तेथे पाणी साठविण्या संदर्भात राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी चर्चा केली,

*माजी नगरसेवक , सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर यांनी यावेळी असे म्हटले की आम्ही कांबळे गल्ली, बाबा भालचंद्र महाराज नगर येथील रहिवासी असल्याने आम्हाला गणपती साना येथील संपूर्ण परिस्थिती माहिती आहे, आजच्या घडीला परिसरातील सर्व विहिरींची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे, तरी आपण लवकरात लवकर यासंदर्भात उपाययोजना करावी, अशी विनंती केली,

*यावेळी कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांनी आपण आजच पाहणी करून, ताबडतोब उपाययोजना करतो, असे आश्वासन दिले,

*यावेळी उपस्थित सर्वांनी साहेबांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!