*कोंकण Express*
*सार्वजनिक वाचनालय, ग्रंथालयासाठी दर्जेदार दिवाळी अंक, कवितासंग्रह, कथासंग्रह भेट देणार : डॉ. सुनीलकुमार सरनाईक
करवीर काशी फौंडेशनचा अभिनव समाजोपयोगी उपक्रम*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले.*
कोल्हापूर येथील करवीर काशी फौंडेशन ही संस्था गेली २५ वर्षे साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. यानिमित्ताने जुने, तसेच चालू, संग्राह्य, माहितीपूर्ण दिवाळी अंक व काव्यसंग्रह तसेच कथासंग्रह सार्वजनिक वाचनालय, ग्रंथालयासाठी भेट म्हणून देण्याची योजना संस्थेने जाहीर केली आहे.
वाचनालयांना, ग्रंथालयांना हवे असलेले दिवाळी अंक, कवितासंग्रह, कथासंग्रह निवडून मिळतील असे नाही. तसेच चांगल्या दर्जेदार अंकांचा समावेश असलेल्या या योजनेत बाहेर गावच्या वाचनालय व ग्रंथालय यांना अग्रक्रम दिला जाईल. इच्छुक वाचनालयाच्या अध्यक्ष किंवा ग्रंथपाल यांनी एका अंकासाठी किंवा एका कवितासंग्रहासाठी पोस्टेज खर्च व बांधणी खर्च म्हणून प्रत्येकी रुपये १०/- प्रमाणे मनी आर्डर करावी, असे आवाहन करवीर काशी फौंडेशन चे अध्यक्ष डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांनी केले आहे. त्यासाठी मनी ऑर्डर करवीर काशी फौंडेशन, पैस, रि.स.नं.७४६/१, वसंतराव सरनाईक पार्क, देवकर पाणंदनजीक, पोस्ट कळंबा, कोल्हापूर -४१६००७, मो. ९४२०३५१३५२ येथे पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.