सिंधुदुर्ग जिल्हावासियांकडून आमदार वैभव नाईक यांच्यावर वाढदिवसादिनी शुभेच्छांचा वर्षाव

सिंधुदुर्ग जिल्हावासियांकडून आमदार वैभव नाईक यांच्यावर वाढदिवसादिनी शुभेच्छांचा वर्षाव

*कोंकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्हावासियांकडून आमदार वैभव नाईक यांच्यावर वाढदिवसादिनी शुभेच्छांचा वर्षाव*

सिंधुदुर्ग जिल्हावासीयांनी २६ मार्च या आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसादिनी शुभेच्छांचा वर्षाव केला. वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सायंकाळी आ. वैभव नाईक यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन कार्यक्रमांमध्ये देखील मोठ्या संख्येने जिल्हावासीय उपस्थित होते. शुभेच्छा देण्यासाठी झुंबड लागली होती. यावेळी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत केक कापून आ. वैभव नाईक यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी खा. विनायक राऊत यांनी बोलताना सांगितले की, खोक्यांच्या मागे बोके पळाले पण आमदार वैभव नाईक यांच्यासारखा निष्ठावंत सच्चा कार्यकर्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत निष्ठेने राहिला याचा अभिमान आहे. म्हणून निष्ठावंत शिवसैनिकांचा वाढदिवस आपण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचे राऊत यांनी सांगितले.

याप्रसंगी शिवसेना उपनेते राजन साळवी, उपनेते अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, अतुल
रावराणे, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर,काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, अर्चना घारे, गीतेश राऊत, काँग्रेस कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, जान्हवी सावंत, नीलम पालव,मंदार शिरसाट, सुशांत नाईक, नागेश मोरये, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस भास्कर परब,सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,संग्राम प्रभुगावकर, मुरलीधर नाईक, उद्योजक सतीश नाईक, संकेत नाईक, आ.वैभव नाईक यांच्या आई सुषमा नाईक, पत्नी स्नेहा नाईक,मुलगी नंदिनी नाईक,मुलगा राजवर्धन नाईक,मेधज नाईक, उद्योजक प्रशांत पोकळे, उद्योजक स्वरूप कदम, शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर,बाळा गावडे,हरी खोबरेकर,रुपेश राऊळ,बाळू परब,शैलेश भोगले,राजू शेटये,बुवा तारी,संतोष तारी,जयेश नर,मिलिंद साटम,मंगेश लोके,मंदार केणी, शिल्पा खोत, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष साक्षी वंजारी,आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणेकर, ऍड किशोर वरक, अजित राऊळ, बाळा भिसे,रुपेश नार्वेकर, राजू राठोड यांच्यासह बहुसंख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक, मित्रपरिवार, व्यापारी, उद्योजक आणि वैभव नाईक प्रेमी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!