वापरा नैसर्गिक रंग उधळा होळीचा रंग

वापरा नैसर्गिक रंग उधळा होळीचा रंग

*कोंकण Express*

*वापरा नैसर्गिक रंग उधळा होळीचा रंग …….*

*सौ. इं. द. वर्दम हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम*

कोकणात मोठ्या उत्साहात ‘होळी उत्सव’ साजरा केला जातो.
बाजारात मिळणारे भेसळयुक्त व रासायनिक रंग यामुळे त्वचेवर व शरीरावर अपायकारक परिणाम होतात आणि पर्यावरणाचीही हानी होते. शिवाय हवेचे तसेच मातीचेही प्रदूषण होते. याविषयी प्रशालेत कला व हरीत सेना विभाग अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
पोईप हायस्कूलमध्ये पर्यावरणपुरक रंग प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.मुलांनी घरच्या घरी नैसर्गिक रंग बनवावेत यासाठी फळे, फुले, भाजीपाला तसेच औषधी वनस्पती यापासून रंग सहज कसे तयार करता येतात हे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. या रंग प्रात्यक्षिक कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा उत्साह फार होता. विद्यार्थ्यांनी स्वतः रंग तयार केले.विद्यार्थ्यांबरोबरच मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. मा. मुख्याध्यापक श्री. कुंभार सरांच्या मार्गदर्शनाखाली शेवटी स्वनिर्मित नैसर्गिक रंगांची उधळण करत विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंददेखिल लुटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!