*कोंकण Express*
*सोमलेवाडीचे लक्ष्मण घोटेकर आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित*
*कासार्डे प्रतिनिधी :संजय भोसले*
हुतात्मा अपंग बहुउद्देशिय विकास कल्याणकारी संस्थेचा – ११ वा राष्ट्रीय अक्कलकोट भूषण पुरस्कार २०२४ – पुरस्कार वितरण सोहळा – श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे संपन्न झाला .
देशभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यात आले. यामध्ये २५मार्च१९९८ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यंत ग्रामिण भागातील जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा-पाळेकरवाडी येथे १४ वर्षे तर गेली १२वर्षे जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा-सोमलेवाडी ता.देवगड येथे उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदावर कार्यरत असणारे श्री.लक्ष्मण ताईबाई भागा घोटकर यांना *”आदर्श शिक्षक ११वा राष्ट्रीय अक्कलकोट भूषण पुरस्कार २०२४.”* देऊन सन्मानित करण्यात आले.श्री.लक्ष्मण घोटकर हे गाव-केळी-कोतुळ, ता.अकोले,जि.अहमदनगर येथील मूळराहिवासी असून गेली ३१वर्षे त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यंत ग्रामिण भागात आपल्या शिक्षकीपेशातील कष्टाळूवृत्ती जोपासून,मनमिळाऊ स्वभावाने,पेशाशी प्रामाणिक राहुन,जबाबदारीच्या जाणिवेतून ,कर्तृत्वनिष्ट,सामाजिक प्रेरणा व जाणिवेतून आणि नि:स्वार्थी वृत्तीने काम करुन आपल्या कर्तव्याचा ठासा उमटवलेला आहे.वरील दोन्ही शाळांमध्ये सर्व शिक्षा मोहिमेतून प्रशस्त इमारती बांधकामे,समाज सहभागातून रंगमंच बांधकाम,शाळा प्रवेशद्वार बांधकाम,दोन्हीपैकी एकाही शाळेला मैदान उपलब्ध नसतांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित वार्षिक क्रीडास्पर्धांमध्ये प्रत्येक वर्षी खो-खो सारख्या खेळात विजयी पताका फडकत ठेवली आहे. याबरोबर,पालकमेळावे, आई-बाबां पाद्य पुजण, माजी विद्यार्थ्यांचे वय वर्षे ५०पूर्ण झाले की एकत्रित वाढदिवस, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी आणि चांगले निकाल परंपरा,रानभाज्या पाककृती, वार्षिकस्नेहसम्मेलना- मध्ये पालकांच्या कायम ठेव रक्केतून वर्षभरातील क्रमांक प्राप्त विद्यार्थी-विद्यार्थिनींना बक्षिस वितरण असे अनेक प्रकल्प,वैशिष्ट्ये पूर्ण उपक्रम राबवून नेहमी आपल्या शाळेचे,विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आणि शिक्षकांचे हीत जोपासणारे मुख्याध्यापक श्री.लक्ष्मण घोटकर यांना हा पुरस्कार रुपी बहुमान मिळाला त्याबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे.
या सोहळ्यास उपस्थित मान्यवर डॉ.सुनिल फडतरे साहेब
( संस्था संस्थापक अध्यक्ष )
डॉ.देवेंद्र देवळाणकर साहेब
(संचालक – उच्च शिक्षण विभाग व आंतरराष्ट्रीय परराष्ट्र धोरण व अभ्यासक महाराष्ट्र राज्य.)
ह.भ.प.सागर महाराज देशमुख
(वकिल-अमरावती)
मा.अथर्व कर्वे,(सुप्रसिद्ध अभिनेता-महानायक डॉ बाबासाहेब आंबेडकर व विठू माऊली-भक्त पुंडलिक व्यक्तिरेखा)
मा.डॉ.शाहीर आझाद नाईकवाडी
( आंतराष्ट्रीय किर्तीचे शाहीर )
प.पू.अण्णू महाराज
(चोळप्पा महाराजांचे वंशज अक्कलकोट)
मा.अमोलराजे भोसले,
(विश्वस्थ-स्वामी समर्थ अन्नछत्र अक्कलकोट)
मा.महेश कल्याणराव इंगळे साहेब
( चेअरमन तथा विश्वस्त – श्री. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान – अक्कलकोट )
आदीच्या प्रमुख उपस्थिती त सोहळा संपन्न झाला .
सुत्रसंचलन – आभार – श्री विजय आनंद वाघमोडे सर (चिपळूण)यांनी केले तर या
कार्यक्रमाचे नियोजन हुतात्मा संस्थेचे विश्वस्थ सदस्य मंडळ यांनी केले होते.