जागतिक वन दिन : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत उत्साहाने साजरा

जागतिक वन दिन : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत उत्साहाने साजरा

*कोंकण Express*

*जागतिक वन दिन : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत उत्साहाने साजरा*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत हरितसेना विभाग व पर्यावरण सेवा विभाग यांच्या संयुक्त विध्यमाने जागतिक वन दिन ‘ व चिमणी दिन साजरा करण्यात आला यावेळी सामाजिक वनिकरण विभागाचे प्रमुख मा बेलवाडकर साहेब अनिल पाटील साहेब इंदुलकर साहेब व वन विभागाचे सर्व कर्मचारी वृंद प्रशालेत उपस्थित होते . प्रास्ताविक आणि स्वागत श्री नागभिडकर सरांनी केले . यावेळी आदरणीय बेलवाडकर साहेबांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले पर्यावरण व चिमणी पक्षी यांची मानवी जीवनातील महत्व तसेच वनीकरण लागवड कशी करावी जंगलांचे सामाजिक स्थान विद्यार्थी जीवनात निसर्गाची जोपासना याविषयी सखोल माहिती कथन केली . प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी .जे . कांबळे सरांनी चिमणी पक्षी व वृक्ष लागवडीचे महत्व स्वतःच्या कृतीतून विद्यार्थ्याना समजून सांगितले . या प्रसंगी प्रशालेत वर्षभर हरिसेना व पर्यावरण विभाग यांनी सामाजिक वनीकरणांचे विविध उपक्रम राबवून उच्च दर्जाचे यश संपादन केल्यामुळे आदरणीय बेलवाडकर साहेब व सामाजिक वनिकरण विभाग यांनी प्रशालेच्या यशस्वी उपक्रमांचे कौतुक करून प्रशंसा केली . व हरितसेना विभागासाठी विशेषआर्थिक तरतूद केली . या कार्यक्रमाला विशेष सहाय्य उपक्रमशील अध्यापक श्रीराणे पी . एस यांचे लाभले . पर्यवेक्षिका सौ जाधव मॅडम उपस्थित होत्या . विद्यार्थी वर्ग मोठ्या संस्थेने हजर होते . हरिसेना विभाग प्रमुख सौ शिरसाठ मॅडम यांनी आभार मानुन कार्यक्रमांची सांगता झाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!