*कोंकण Express*
*महात्मा गांधी रिचर्स सेंटर जळगाव : गांधी संस्कार परिक्षेत विद्यामंदिर माध्य प्रशाला अव्वल*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
महात्मा गांधी रिचर्स सेंटर जळगाव या संस्थेने म . गांधीचे संस्कारक्षम विचार नव्या पिढीला समजावेत या उद्देशाने भारतभर विविध भाषेत गांधीजीचे आदर्श विचार त्यांचे चरित्र पुस्तक रूपात विद्यार्थ्यांना देवून त्याच्यावर परीक्षा आयोजित केली जाते या वर्षी विद्यामंदिर प्रशालेतून सत्तर ते ऐंशी विद्यार्थी पाचवीते नववी पर्यंतचे या परिक्षेला प्रविष्ठ झाले होते . म गांधीजीचे विचार सर्व विद्यार्थ्यांनी आत्मसात करून ही परीक्षा अभ्यासपूर्वक दिली या परिक्षेचा निकाल शंभरटक्के लागला असून . अनेक विद्यार्थी गोल्ड मिडल व प्रमाणपत्र धारक झाले आहेत . यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर श्री वणवे सर श्री दरवडा सर सौ शिरसाट मॅडम सौ वारघडे मॅडम याच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमांचे व्यवस्थापन श्री दरवडा सर यांनी केले .