*कोंकण Express*
*शिवसेना शहर प्रमुख प्रमोद शेठ मसुरकर यांना गाडी जाळून टाकण्याची धमकी*
*मसुरकर यांच्या वाहनांना पोलीस संरक्षण*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसेना शहर प्रमुख प्रमोद शेठ मसुरकर यांनी ठाकरे गटातून दोनच दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला होता. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या दोघांनी मसुरकर यांना आम्हाला होळीचे पैसे दे अन्यथा आमची मुले काय करतील हे सांगता येणार नाही. तू शिंदे गटात गेलास म्हणजे मोठा झालास काय? होळीचे पैसे दे अन्यथा तुझ्या गाड्या जाळून टाकणार व तुला ठार मारणार अशी फोनवरून धमकी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते राजू राठोड व रमेश चव्हाण यांनी दिली अशी तक्रार शिवसेना शहर प्रमुख प्रमुख शेठ मसुरकर यांनी कणकवली पोलीस स्थानकात दिली आहे. या तक्रारीवरून राजू राठोड व रीमेष चव्हाण यांच्या विरोधात 504, 506 व 34 अन्वये अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यानंतर सोमवारी रात्री एक वाजल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीच्या उपायोजना म्हणून तातडीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला