*कोंकण Express*
*कार्यकारी अभियंता सर्वगौड यांनी उन्हाळ्यात पशु -पक्षी, प्राणी यांच्यासाठी अन्न,धान्य, पाण्याची सोय करून जपली माणुसकी*
*”खरा तो एकचि खर्च जगाला प्रेम अर्पावे” असे साने गुरुजी म्हणतात याची सर्वगौड यांनी करून दिली आठवण*
साने गुरुजी यांनी धर्माची व्याख्या बदलली.जगातील सर्वात मोठा कोमल हदयाचा महान लेखक अणि थोर समाजसुधारक म्हणजे साने गुरुजी हे होय. जग म्हणजे नुसते मानव प्राणी नि भरलेले नसुन या जगामध्ये पशु ,पक्षी, प्राणी व निसर्गाचाही समावेश आहे. आता सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये जवळपास 40 अंश पेक्षा जास्त तापमानाचा पारा चढलेला आहे तसेच दुपारच्या वेळेस रस्त्यावर चिख पाखरु सुध्दा दिसुन येत नाही. प्रचंड तापमानामुळे कावळे,चिमण्या, छोटे छोटे पशु या उन्हाच्या झळयामुळे पाणी अणि खाद्य मिळत नसल्यामुळे त्यांची संख्या रोढावत चालली आहे. मी माझ्या निवासस्थानी पशु पक्षी व प्राण्यांसाठी पाणी व धान्यांची व्यवस्था केलेली आहे. शिवाय सां बा विभाग Kankawali येथील विश्राम गृहात जवळ राष्ट्रीय महामार्ग च्या लागत च्या गटारात एक कुत्री नी चार पिलांना जन्म दिला आहे त्यांना पन मी रोज खाऊ देत आहे जेणेकरुन छोटे छोटे पक्षी अणि प्राणी तसेच निसर्गाचे संवर्धन व्हावे असा या पाठीमागचा उददेश होय. आपण सर्वजण या पृथ्वीचे निसर्गाचे लेकरे आहोत आपण आपल्या कुटुंबाची जशी काळजी घेतो तशी निसर्गातील पशु पक्षी आणि प्राण्यांची सुध्दा काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठीच म्हणुनच कि काय साने गुरुजी म्हणतात. *खरा तो एकचि खर्च जगाला प्रेम अर्पावे*