*कोंकण Express*
*शिक्षक भारती वैभववाडी तालुका अध्यक्षपदी अविनाश कांबळे तर सचिवपदी स्वप्निल पाटील यांची फेरनिवड*
*वैभववाडी तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
शिक्षक भारती सिंधुदुर्ग अंतर्गत वैभववाडी तालुका शिक्षक भारतीची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून तालुका अध्यक्ष म्हणून अविनाश कांबळे तर सचिन पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
सदरची कार्यकारिणी महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह तथा सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर, कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर, राज्य प्रतिनिधी चंद्रकांत चव्हाण, सचिव समीर परब, संघटक आकाश पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली.
*वैभववाडी तालुका शिक्षक भारती नुतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे-*
तालुकाध्यक्ष -अविनाश कांबळे( न्यू इंग्लिश स्कूल हेत), उपाध्यक्ष दीपक घाटगे (करूळ हायस्कूल), शंकर वाघमोडे (माध्यमिक विद्यालय उंबर्डे), कार्याध्यक्ष धनाजी भोसले (नानिवडे हायस्कूल),
सचिव -स्वप्निल पाटील (माधवराव पवार विद्यालय कोकिसरे), सहसचिव- संजयकुमार आडे -(न्यू इंग्लिश स्कूल हेत), संदेश तुळसणकर -(अ.रा.विद्यालय वैभववाडी ),शरद काटकर- (सडूरे अरूळे विद्यालय ), खजिनदार- राजाराम माने (नेर्ले हायस्कूल )संघटक रामचंद्र घावरे (कोकिसरे हायस्कूल) सह संघटक- सचिन क्षीरसागर (कुसुर हायस्कूल ),वैभव पाटील (करूळ हायस्कूल) ,नरहरी डावरे -(लोरे हायस्कूल) संपर्कप्रमुख- सुनील वाडेकर (कोकिसरे हायस्कूल), अजित डिग्रजे (कुसुर हायस्कूल), नजरुद्दीन जमादार (कोळपे हायस्कूल), महिला आघाडी प्रमुख- विशाखा कांबळे (कुर्ली हायस्कूल),दीपा भरडकर (कोकिसरे हायस्कूल) सुमैय्या खलीपे (कोळपे हायस्कूल), तालुका सल्लागार- मिलिंद मिस्त्री- (तिथवली हायस्कूल),
, सुरेश घेरडे (अचिर्णे हायस्कूल ), सदस्य -श्री यासीन नयाघर (कोळपे हायस्कूल), महेंद्र मोरे )मांगवली) ,दिपाली हिरुगडे (कोकिसरे हायस्कूल) संगीता आलदर (नाधवडे हायस्कूल)
तसेच सर्व शिलेदारांचे हार्दिक अभिनंदन.संपुर्ण नूतन कार्यकारिणीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर,सुरेश चौकेकर,प्रशांत आडेलकर,राज्य प्रतिनिधी चंद्रकांत चव्हाण,सचिव समीर परब,संघटक आकाश पारकर व इतर मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छ दिल्या.