*कोंकण Express*
*कुंभवडे येथील शंकर महादेव विद्यालयात “कळी उमलताना’ कार्यक्रम संपन्न*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तालुक्यातील कुंभवडे येथील शंकर महादेव विद्यालय कुंभवडे येथे रोटरी क्लब कणकवलीच्या माध्यमातून कळी उमलताना हा मुलींसाठी कार्यक्रम घेण्यात आला. तसेच मुलांसाठी पौगंडावस्था मार्गदर्शन करणत आले.
या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी डाॅ. प्रिती पावसकर, रो. प्रमोद लिमये, प्रेसिडेंट रो. रवी परब, रो. मेघा गांगण, रो. उमा परब उपस्थित होते. या सर्व उपस्थित मान्यवरांचे शालेय समिती अध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे यांनी स्वागत करून सदर कार्यक्रम कुंभवडे सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी घेतल्याबद्दल आभार मानले.
यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका अपूर्वा सावंत प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी प्रशालेतील सर्व मुलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. मुलांचे हिमोग्लोबीन तपासणीसाठी अल्प दरात सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल रो.डाॅ. विद्याधर तायशेट्ये यांचे देखील ॲड. राजेंद्र रावराणे यांनी प्रशालेतर्फे विशेष आभार मानले. शंकर महादेव विद्यालय कुंभवडे या प्रशालेत दर दोन महिन्यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी घेतली जाते. तसेच विविध आजारांवर मार्गदर्शन वर्ग घेतले जातात.