*कोंकण Express*
*कै.सिताराम सखाराम तर्फे सर स्मृती चॅरिटेबल ट्रस्टचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर..”
*प्राथमिक विभागातून श्री.विष्णु महादेव परब तर माध्यमिक विभागातून श्री.रघुनंदन अंकुश घोगळे यांची निवड*
जांभवडे ता.कुडाळ येथील कै.सिताराम सखाराम तर्फे सर स्मृती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी प्राथमिक आणि माध्यमिक विभागातून जांभवडे पंचक्रोशी मर्यादित आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केले जातात.न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडेचे माजी पर्यवेक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते कै.सिताराम सखाराम तर्फे सर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन केलेल्या ट्रस्टच्या वतीने दरवर्षी विविध शैक्षणिक सामाजिक, सांस्कृतिक वैद्यकीय , उपक्रम राबविण्यात येतात.तसेच त्यांच्या स्मरणार्थ आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात.या वर्षीचा प्राथमिक विभागातून दिला जाणारा पुरस्कार कुपवडे गावाचू सुपुत्र श्री.विष्णु महादेव परब यांना जाहीर करण्यात आला आहे.श्री.विष्णु परब यांचे शिक्षण एम ए.डी एड असून प्राथमिक विभागात त्यांनी शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून ३४वर्षे उत्कृष्ट कामगिरी केली आहे.पुर्ण प्राथमिक शाळा कुवळे नं१ या शाळेतून उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करुन ते ३१डिसेंबर२०२३रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.श्री.विष्णु परब यांनी शैक्षणिक कार्य करत असताना सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.माध्यमिक विभागातून भरणी गावचे सुपुत्र श्री.रघुनंदन अंकुश घोगळे यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.श्री.रघुनंदन घोगळे हे महात्मा गांधी विद्यालय,तळेबाजार येथे मुख्याध्यापक म्हणून उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करत आहेत.त्यांनी एम ए हिंदी ,मराठी, हिंदी पंडित,डी.एस.एम या पदव्या प्राप्त केल्या आहेत.त्यांनी शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून २८वर्षे सेवा केली आहे.अनेक सामाजिक,सांस्कृतिक धार्मिक, संघटनात्मक कार्यात ते सहभागी होत असतात.ते पर्यावरण संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करत आहेत.गत वर्षीचा राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला आहे.सदर पुरस्कारा बद्दल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती शिल्पा तर्फे, सचिव तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.वामन तर्फे, सर्व विश्वस्त यांनी श्री.विष्णु परब सर आणि श्री.रघुनंदन घोगळे सर यांचे अभिनंदन केले.सदर पुरस्कारांचे वितरण शनिवार दिनांक ११/५/२४रोजी जांभवडे येथे सन्मानपूर्वक करण्यात येणार आहे.