*कोंकण Express*
*शिंदेे शिवसेना गटाच्या शहर प्रमुखांना दिल्या शुभेच्छा*
*कणकवली ,आज दिनांक २१/०३/२०२४ रोजी कणकवली शहराच्या शहर प्रमुखपदी निवड करण्यात आलेल्या प्रमोदशेट मसुरकर यांना माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या,
*यावेळी माऊली मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य अविनाश गावडे, बाबुराव घाडीगावकर, भगवान कासले , प्रभाकर कदम व मंडळाचे सल्लागार सुभाष गोविंद उबाळे आदी उपस्थित होते,
*यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की, प्रमोद मसुरकर हे धडाडीचे कार्यकर्ते आहेतच, सामाजिक भान ठेवून समाजातील सर्व घटकांचा सातत्याने विचार करून, त्यांच्या करिता सतत त्यांची धडपड सुरू असते, आणि सर्वात महत्त्वाचे मैत्री कशी असावी याचे जिवंत उदाहरण म्हणजे आमचे मित्र प्रमोदशेट मसुरकर,
*आमची मैत्री शालेय जीवनापासून असुन, निव्वळ मैत्री असून चालत नाही, तर ती कशी जपावी याचे भान असणारे, म्हणजे प्रमोद मसुरकर असे ही राजेंद्र मनोहर पेडणेकर म्हणाले,
*उपस्थित सर्वांनी प्रमोदशेट मसुरकर यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या,