*कोंकण Express*
*कोल्हापुरात म्हैस आडवी आल्याने अपघात; तरुणी ठार, दोघे गंभीर जखमी*
*कोल्हापूर प्रतिनिधी :*
याबाबत समजलेली माहिती अशी, कात्यायनी परिसरात काझी कुटुंबीय राहतात. मुलगी(buffalo) आजारी असल्यामुळे तिच्या उपचारासाठी हे कुटुंबिय सोमवारी सायंकाळी तिघेजण एकाच दुचाकीवरून कोल्हापुरात आले होते. उपचारानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तिघेजण कत्यायनी पार्क येथील घराकडे निघाले होते.
कळंबा – कात्यायनी रोडवरील घोडके मळा येथे झुडूमाच्या आडून अचानक शेतातून एक जनावर पळत रस्त्यावर आले. यावेळी काझी यांची दुचाकी या जनावाराला धडकली. दुचाकी काही अंतरावर फरफटत गेल्याने दुचाकीवरील तिघेजण गंभीर जखमी झाले.

रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांनी तेथे थांबून जखमींना बाजुला घेतले. त्यानंतर फोनवरून जुबेर काझी यांचा सख्खा भाऊ शहीद आणि चुलत भाऊ शाकीफ यांना अपघाताची माहिती दिली. तिथून १ किलोमिटर अंतरावर राहणाऱ्या काझी कुटूंबियांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अफरीन बुखारी, फरजाना काझी यांना रिक्षातून तर जुबेर काझीला रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात दाखल केले. दरम्यान गंभीर अफरीन बुखारीचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. तर फरजाना काझी आणि जुबेर काझी यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर दुधाळी परिसरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.

या अपघातात अफरीन यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यावर काझी कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. रात्री उशिरापर्यंत कुटुंबिय सीपीआर रुग्णालयात थांबून होते. उत्तरीय तपासणी करून मृतदेह रात्रीच नातेवाईकांच्या ताब्यात देऱ्यात आला