*कोंकण Express*
*के सी सी मित्र मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत रामेश्वर नगर संघ विजेता तर पंचशील खारेपाटण संघ उपविजेता*
*विजेता संघाला १ बोकड तर उपविजेता संघाला ११ कोंबडे बक्षीस रुपात प्रदान*
*खारेपाटण : प्रतिनिधी*
खारेपाटण येथील के सी सी मित्र मंडळ कोष्टेवाडी, खारेपाटण यांच्या वतीने नुकतेच केदारेश्वर मैदान खारेपाटण येथे दोन दिवसीय भरविण्यात आलेल्या भव्य टेनिस बॉल ओहर आर्म अर्थात खारेपाटण प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत रामेश्वर नगर खारेपाटण हा संघ अंतिम विजेता ठरला. तर पंचशील नगर खारेपाटण हा संघ उपविजेता ठरला.
या क्रिकेट स्पर्धेचे उद्धघाटन सामाजिक कार्यकर्ते प्रवीण लोकरे, भाऊ राणे व संदेश धुमाळे, संकेत शेट्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले होते. फक्त खारेपाटण गाव वाडी मर्यादित असलेल्या क्रिकेट स्पर्धेत एकूण १२ संघांनी सहभाग घेतला होता. तर या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई, रुपेश सावंत, निखिल गुरव, संतोष पाटणकर, दिगंबर राऊत, अनंत गुरव, किरण कर्ले, प्रशांत धुमाळे, के सी सी मित्र मंडळाचे अध्यक्ष उत्तम रोडी, रामेश्वर नगर संघाचे कोच महादेव मोटे सर, मंडळाचे कार्यकर्ते सचिन निग्रे, संकेत लोकरे, किशोर निग्रे, संतोष लोकरे, प्रणय गुरसाळे, सुशांत रोडी, सूरज कांबळी, जयेश लोकरे आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचे के सी सी मित्र मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
के सी सी मित्र मंडळाच्या वतीने प्रथमच खारेपाटण मध्ये एका आगळ्या वेगळ्या स्वरूपाच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेतील अंतिम विजेता रामेश्वर नगर खारेपाटण या संघाला एक बोकड व प्रथम क्रमांकाचा आकर्षक चषक निखिल गुरव व प्रशांत धुमाळे यांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले. तर या स्पर्धेतील उपविजेता ठरलेल्या पंचशील नगर खारेपाटण या संघाला ११ गावठी कोंबडे व द्वितीय क्रमांकाचा आकर्षक चषक विजय देसाई व उत्तम रोडी यांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले.