रेल्वे स्टेशन सुशोभीकरण काम आचारसंहितेपुर्वी होणार या आश्वासनाचे काय ?

रेल्वे स्टेशन सुशोभीकरण काम आचारसंहितेपुर्वी होणार या आश्वासनाचे काय ?

*कोंकण Express*

*रेल्वे स्टेशन सुशोभीकरण काम आचारसंहितेपुर्वी होणार या आश्वासनाचे काय ?*

*नियम धाब्यावर बसून श्री. सर्वगोड कामे करत असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कार्यकारी अभियंता सर्वगोड हे जनतेची फसवणूक करून जनतेला उल्लू बनवत आहेत. कणकवली रेल्वे स्टेशन सुशोभीकरण काम आचारसंहिते पूर्वी करण्याचे त्यांनी आश्वासन श्री. सर्वगोड यांनी दिले होते. मात्र अद्याप कणकवली रेल्वे स्टेशनसह जिल्ह्यातील अन्य रेल्वे स्टेशन सुशोभीकरण चे काम अपूर्ण राहिलेले आहे. कणकवली आचरा रस्त्याचे काम करत असताना वनसंज्ञा असलेल्या गावांमध्ये कोणतीही परवानगी न घेता बेसुमार वृक्षतोड करण्यात आली आहे यासंदर्भात आपण नागपूर येथील वनविभाग कार्यालयात तक्रार केली आहे. ही विकासकामे करताना नियम धाब्यावर बसून श्री. सर्वगोड कामे करत असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.

कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री. उपरकर म्हणाले, ८ मार्च रोजी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी ऑनलाइन केलेल्या २९ भूमीपूजनांपैकी कणकवली आचरा मार्गावरील वरवडे येथील रस्ता रुंदीकरण कामचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, हे काम जानेवारी पासून श्री. सर्वगोड यांनी सुरू केलेले आहे. या कामात नदीतील गोठे आणि माती साईट पट्टीसाठी वापण्यात आली. तहसिलकार्यालयाची यासंदर्भात कोणतीही परवानगी घेतली नाही. त्याचा लाखो रुपयांचा दंड होईल यासंदर्भात तहसिल कार्यालयात तक्रार केली आहे. तसेच या रस्त्याच काम करत असताना वनसंज्ञेत येणा-या गावांमधील वृक्षतोड केली आहे. स्टेज वन स्टेज टू ची परवानगी न घेता ही वृक्षतोड करण्यात आली आहे. याची तक्रार वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी नागपूर येथे केली असल्याचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले.

पुलांची कामे करताना सीआरझेड व एमसिझेड ची परवानगी घ्यावी लागते, जी कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी घेतलेली नाही. ठेकेदारांना कामे देऊन स्वतः साठी पैसे गोळा करण्याचे काम सर्वगोड करत आहेत. कणकवली येथील कार्यालयात अनुपस्थित राहत कार्यकारी अभियंता सर्वगोड मुंबई दौरे करत आहेत. त्याच्या नोंदी आढळून येत नाहीत. कणकवली येथील कार्यालयात 2, 3, 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी मी स्वतः भेटीसाठी गेलो असता सर्वगोड मुंबई येथे गेल्याचे सांगण्यात आले. श्री. सर्वगोड यांच्या मुंबई दौऱ्याबाबत माहिती मागितली असता चीफ इंजिनिअर यांनी व्हाटसपवर मला मेसेज केला. माहिती अधिकारात मागितलेली माहिती न देता लपवण्याचा प्रयत्न सर्वगोड करत आहेत. मुंबईत कार्यालयीन कामकाज सांगून सर्वगोड मंत्र्यांच्या एका पीए ला भेटतात. त्याचीही माहिती उजेडात आणणार असल्याचा दावा परशुराम उपरकर यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!