*कोंकण Express*
*कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या संकल्पकतेतून साकारल्या स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणी !*
दिन दुर नही, खंडित भारत को अखंड बनायेंगे, गिलगित से गारो पर्वत, आजादी पर्व मनायेंगे- स्व. वाजपेयी यांच्या तैलचित्राचे अनावरण
नूतनीकरणानंतर ऐतिहासिक फोंडाघाट शासकीय विश्राम धामचा लोकार्पण सोहळा आमदार नितेश राणेंच्या हस्ते उत्साहात संपन्न !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : पुन्हा एकदा नूतनीकरण झाल्यानंतर, सार्व. बांधकाम विभाग- कणकवली मधील, सर्वात जुना
ऐतिहासिक वारसा असलेला, शासकीय फोंडाघाट विश्रांतीगृहाचे लोकार्पण आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांचे हस्ते फीत कापून आणि विद्यमान आमदार नितेश राणे यांचे हस्ते संपन्न झाले. सुमारे ३४ लाख रुपये खर्च करून बांधलेल्या ‘सह्याद्री विश्रामधाम “ला उगवाई आणि ‘शिवगंगा ‘हे दोन कक्ष, स्वागत कक्ष आणि व्हरांड्यातील स्व, अटलबिहारी वाजपेयी यांच्या भव्य तैलचित्रासह, त्यांची “स्वतंत्रता की पुकार” हे काव्य, फोटो फ्रेम मध्ये सर्वांनाच आकर्षित करते. कार्यकारी अभियंता सर्वगोड यांच्या कल्पकतेतून साकारलेले, हे औचित्यपूर्ण नामकरणांनी संपन्न, विश्रामधामचे बांधकाम त्यातील सुविधा- प्रशस्त हॉल आणि खानसामानाची शिपाई खोली इत्यादी, येणारे अधिकारी आणि पर्यटकांसाठी लक्षवेधी ठरणार आहेत. युतीच्या काळातील ही विकास कामे भविष्यात पर्यटक आणि व्यवसाय उदिमासाठी युवकांना प्रेरणादायी ठरतील, असे उद्गार माजी आमदार प्रमोद जठार यांनी काढले, निसर्गरम्य प्रवेशद्वारावरील गावातील “सह्याद्री विश्रामधाम अन त्यातील’ शिवगंगा ‘अन ‘उगवाई’ कक्ष येथील पारंपारिक वारशा ने समृद्ध होतीलच, परंतु १९६१ मध्ये खासदार स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचे येथील वास्तव्य, रत्नागिरी- सिंधुदुर्ग एकत्र असतानाच्या राजकीय बैठका, शालिनीताईंचे यथोचित स्वागत, तालुका निर्मिती, बापूसाहेब प्रभूगावकर यांचे आयटीआय चे अभिवचन इ. ऐतिहासिक गोष्टी चे औचित्य साधून या विश्रामधाम ची आकर्षक टिकाऊ आणि कलात्मक वास्तू निर्मिती केल्याबद्दल विद्यमान आमदार यांनी सार्वगौड यांचे कौतुक केले.
यावेळी सार्व. बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अजयकुमार सर्वगौड, अधीक्षक अभियंता छाया नाईक, तहसीलदार दीक्षांत
देशपांडे, उप अभियंता प्रभू, अभियंता पवार, नायब तहसीलदार यादव, मंडल अधिकारी दिलीप पाटील, मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री, बबलू सावंत, राजान चौके, बबन हळदिवे, उपसरपंच तन्वी मोदी, दर्शना पेडणेकर, विश्वनाथ जाधव, सुजाता हळदिवे, सुनील लाड, भाई भालेकर इत्यादी ग्रामपंचायत सदस्य- ग्रामस्थ उपस्थित होते.
फोंडाघाट विश्रांती ग्रहाचे सुमारे दहा वर्षांपूर्वी दुरुस्ती- नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र गेल्या दोन वर्षात त्यांची अवस्था दयनीय झाली होती. स्लॅब सिलिंग तुटले होते. गळती होत होती. वायरिंग खराब झाले. त्यामुळे पर्यटक अथवा अधिकाऱ्यांना फोंडाघाट मध्ये राहण्याची- विश्रांतीची निकड भासत होती. मात्र मुख्य अभियंता सर्वगौड यांच्या पुढाकाराने सुसज्ज वास्तू उभी राहिली आहे. त्यामुळे या लक्षणीय सोहळ्याचे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.