तळेरेतील सेवानिवृत्त वरीष्ठ पोलीस अधिकारी सुर्यकांत तळेकर अक्कलकोट भूषण पुरस्कार २०२४ ने सन्मानित

तळेरेतील सेवानिवृत्त वरीष्ठ पोलीस अधिकारी सुर्यकांत तळेकर अक्कलकोट भूषण पुरस्कार २०२४ ने सन्मानित

*कोंकण Express*

*तळेरेतील सेवानिवृत्त वरीष्ठ पोलीस अधिकारी सुर्यकांत तळेकर अक्कलकोट भूषण पुरस्कार २०२४ ने सन्मानित*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

तळेरे येथील सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी सूर्यकांत तळेकर यांना कराड येथील हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेचा मानाचा 11 वा राष्ट्रीय अक्कलकोट भूषण पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे. त्यांना सामाजिक विभागात समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात येईल. हा कार्यक्रम 18 मार्चला अक्कलकोट येथे होणार आहे.

सूर्यकांत तळेकर यांनी मुंबई मध्ये आपली सेवा बजावली आहे. या सेवा काळात त्यांनी अनेक मोठमोठ्या घटनांच्या तपासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांना गुन्हे शाखेत काम करण्याची संधी मिळाली. असंख्य बड्या गुन्हेगारांचे कर्दनकाळ आणि गरीब जनतेचे अश्रू पुसण्याचे काम तळेकर यांनी केले.

तर सेवानिवृत्ती नंतरही तळेरे परिसरात तळेकर यांनी आपली सामाजिकता जोपासत अनेकांना मदत करत आहेत. विविध संस्थांमध्ये निस्वार्थ काम करताना त्या पदालाही न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन 11 व्या राष्ट्रीय अक्कलकोट भूषण पुरस्कार 2024 साठी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे अभिनंदन आणि निवड पत्र संस्थेच्या वतीने अध्यक्ष सुनील फडतरे यांनी पाठवून कळविले आहे.

या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार असून याबद्दल तळेकर यांचे सर्व परिसरातून अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!