*कोंकण Express*
*शिरवल मुख्य रस्त्याचे माजी जि.प. अध्यक्ष संदेश सावंत यांच्या शुभहस्ते भूमिपूजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मागील काही दिवसांपासून कणकवली शहरात आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकास कामांची शुभारंभ व भूमिपूजन मोठ्या प्रमाणात होत आहेत. आ. नितेश राणे यांच्या पाठपुराव्यातून शिरवल मुख्य रस्त्याचे भूमिपूजन जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष संदेश सावंत तसेच कणकवली पंचायत समितीचे माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
शिरवल माजी सरपंच महेश शिरवलकर, उद्योजक पंढरी शिरवलकर, ग्रामपंचायत सदस्य सुचित गुरव, तसेच राजन सावंत, पांडुरंग सावंत, सुभाष पाताडे, बाळा राणे, राजेंद्र चव्हाण, मोहन वारंग, हरिश्चंद्र सोहनी, अनिल कुडतरकर, ज्ञानेश्वर शिरसाट, विजय कासले ,
चंद्रकांत तांबे, विजय शिरवलकर, विपीन गुरव , अनिकेत कासले, सचिन चव्हाण, सतीश परब, सुनील तांबे, दिनेश घाडीगांवकर, शुभम चव्हाण,निकीता शिरसाट,दिपका सापळे,सारिका गुरव, मेघा घाडीगांवकर, प्राची शिरवलकर, सोनाली शिरवलकर, सुजाता गुरव व सर्व गावातील भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.