*कोंकण Express*
“राजपत्रीत अधिकारी शलाका तांबे यांचे कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले*
*कासार्डे प्रतिनिधि : संजय भोसले*
कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने राजपत्रित अधिकारी श्रीमती शलाका तांबे यांचे स्वागत करण्यात आले. तसेच कर्तुत्वान महिला म्हणून कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने राज्य अध्यक्ष श्री.आकाश तांबे यांनी , सन्मानपत्र व प्राध्यापक हरी नरके लिखित महात्मा ज्योतिबा फुले पर्यायी समाज व्यवस्थेचे शिल्पकार हे पुस्तक देऊन गौरविण्यात आले. यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर नादकर, जिल्हा सदस्य संजय राठोड, राज्य सचिव ज्ञानेश्वर कुंभरे , जिल्हा कोषाध्यक्ष माणिक वंजारे , कुडाळ तालुका अध्यक्ष समीर नाईक, वैभववाडी तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश तांबे, विकास पवार, एन पी. कांबळे (मालवण) इत्यादी पदाधिकारी यांनी श्रीमती शलाका तांबे मॅडम यांचे यावेळी अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

