*कोंकण Express*
*नुतन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कविता शिंपी यांचे आकाश तांबे (राज्याध्यक्ष कास्ट्राईब) यानी स्वागत केले*
*कासार्डे प्रतिनाधी : संजय भोसले*
कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने श्रीमती कविता शिंपी मॅडम शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे स्वागत करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष आकाश तांबे, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर नादकर, जिल्हा सदस्य संजय राठोड, राज्य सचिव ज्ञानेश्वर कुंभरे , जिल्हा कोषाध्यक्ष माणिक वंजारे , कुडाळ तालुका अध्यक्ष समीर नाईक, वैभववाडी तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश तांबे, विकास पवार, एन पी. कांबळे (मालवण) इत्यादी पदाधिकाऱ्यांनी नूतन शिक्षणाधिकारी मॅडम यांचं यावेळी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.