कलमठ बिडीयेवाडी -गोसावी वाडी रस्ता काम शुभारंभ

कलमठ बिडीयेवाडी -गोसावी वाडी रस्ता काम शुभारंभ

*कोंकण Express*

*कलमठ बिडीयेवाडी -गोसावी वाडी रस्ता काम शुभारंभ*

*कणकवली ः प्रतिनिधी*

बिडीयेवाडी रस्त्याच्या रुंदीकरण व नूतनीकरण अशी अनेक वर्षांची मागणी असलेल्या कामाचा आज कलमठ सरपंच संदिप मेस्त्री यांच्या हस्ते शुभारंभ झाला. कलमठ बिडीयेवाडी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या वस्ती मुळे हा रस्ता रुंद व मजबुतीकरण होणे गरजेचे होते. या कामासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांच्या माध्यमातून ४० लाखाचा निधी मंजूर झाला असून प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होत असल्याने बिडीयेवाडी व गोसावीवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. सदर कामासाठी माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री यांनी पाठपुरव्यानंतर मंत्री नारायण राणे साहेब यांनी सादर कामाला निधी उपलब्ध करून दिला. यावेळी माजी सरपंच महेश लाड, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, सदस्य पपू यादव, सदस्या प्रीती मेस्त्री, नितीन पवार, गणेश पुजारे, ऋत्विज राणे, निनाद नाडकर्णी , संजय गुरव, महेश नाडकर्णी, सुरेश पवार,शैलेजा मुखरें, संदिप म्हाडगुत, श्रावणी मेस्त्री, आबा कोरगावकर, समीर रजपूत, उदय पाटील, बसप्पा पुजारी, समर्थ कोरगावकर, केदार पाटील, प्रतिक माईणकर, जयप्रकाश मालंडकर, हिर्लेकर गुरुजी,परेश कांबळी, दिगंबर सावंत, भूषण सावंत, श्रेयस हिर्लेकर, अशोक कांबळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!