*कोकण Express*
*संदेश पारकर यांच्या हस्ते वारगाव मध्ये विकासकामांचे भूमिपूजन*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील वारगाव या गावी खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन नुकतेच शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या शुभहस्ते वारगाव येथे करण्यात आले.
यावेळी खारेपाटण तळेरे शिवसेना विभाग प्रमुख महेश कोळसुलकर,वारगाव सरपंच बापू नर,उपविभाग प्रमुख दया कुडतरकर,प्रसाद गाठे,शाखा प्रमुख सुनील कुलकर्णी,मधुकर वळंजू , मयूर केसरकर,अरुण मेस्त्री,सावित्री सोरप, दीपक धावडे,सरिता पाटणकर, वैशाली धावडे आदी पुरुष व महिला शिवसैनिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
वारगाव धुमकवाडी या रस्त्यासठी सुमारे दहा लाख रुपये व वारगाव पवारवाडी रस्त्यासाठी सुमारे पाच लाख रुपये खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी मंजूर झाले असल्याचे विभाग प्रमुख महेश कोळसुलकर यांनी सांगितले.