शिक्षक भारतीची माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासोबत अनेक प्रलंबित कामाबाबत सकारात्मक चर्चा

शिक्षक भारतीची माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासोबत अनेक प्रलंबित कामाबाबत सकारात्मक चर्चा

*कोंकण Express*

*शिक्षक भारतीची माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासोबत अनेक प्रलंबित कामाबाबत सकारात्मक चर्चा*

*आदर्श चेकलिस्ट प्रत्येक माध्य- शाळेला देण्याची मागणी*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

अनेक वर्षापासून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित कामाबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. कविता शिंपी व शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटना पदाधिकारी यांच्यात झालेल्या सहसविचार सभेत अनेक प्रलंबित कामाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून काही कामे तातडीने मार्गी लावली जातील अशी ग्वाही माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. कविता शिंपी यांनी शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे.
तसेच उर्वरित कामांचा तात्काळ निपटारा करण्याची विनंती ही शिक्षक भारतीचेवतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना करण्यात आली आहे.
तर, शिक्षण विभागातील काही कर्मचारी जाणीवपूर्वक फाइली गहाळ करत असल्याचा आरोप कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर यांनी करून आपण या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन कर्मचाऱ्यांची होणारी ससेहोलपट तात्काळ थांबवण्याची विनंती त्यांनी या सभेत केली. तर कार्यालयातील कामकाज अतिशय संथ गतीने होत असल्यामुळे आमच्या शिक्षक शिक्षकेतर बांधवांना नाहक भुर्दंड सोसावा लागत असल्याची बाब सी.डी. चव्हाण यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली.
यामध्ये वैद्यकीय देयके, भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या,वरिष्ठ वेतन श्रेणी,रजा कालावधीचे मानधन, पीएफची काही प्रकरणे,प्रत्येक देयका साठीची आदर्श चेक लिस्ट सर्व शाळांना पाठवावी जेणेकरून प्रस्तावात त्रुटी राहणार नाही या व इतर कामाबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या सहविचार सभेला शिक्षक भारती चे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर, कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर,
राज्य प्रतिनिधी सी.डी.
चव्हाण,जिल्हा सचिव समीर परब, जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच शिलेदार अनिकेत वेतुरेकर,दत्तात्रय मारकड,माणिक पवार,प्रभु पंचलिंग,सुष्मिता चव्हाण ,
अनिता सडवेलकर,अरुण गवस, प्रेमनाथ गवस,संदिप नाईक, नारायण कुचेकर,
सुनिल राठोड,संजय भोसले,प्रदिप सावंत,प्रदीप देसाई,
मोहन पालेकर,ज्ञानेश्वर कांबळे आदींसह इतर शिक्षक भारती कार्यकर्ते उपस्थित होते.

अनेकवेळा प्रलंबित कामाची यादी देऊनही कार्यवाही शुन्य –
संजय वेतुरेकर

शिक्षक भारतीच्यावतीने यापूर्वी अनेक वेळा अनेक प्रलंबित कामाची यादी आपल्या कार्यालयात देण्यात आली आहे, तरीही कार्यालयातून जाणिवपूर्वक प्रलंबित कामाबाबत वांरवार त्रुटी काढून पेंडींग ठेवण्याचा प्रकार होत आहे.ही
बाब अतिशय चिड आणणारी असल्याची संतप्त भावना जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी व्यक्त करून मॅडम आपण नुकतेच रुजू झाला आहात म्हणून आंदोलन छेडणे टाळले…. अन्यथा आमची संघटना आजच तीव्र आंदोलन छेडणार होतो अशी माहिती त्यांनी या सभेत व्यक्त केली.
कार्यालयातील दिरंगाई बाबत अनेक कारणे शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देत अशा वृत्तीला आपण आळा घालून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची विनंती त्यांनी याप्रसंगी केली.
मात्र, काही दिवसांत ही प्रलंबित कामे जर झाली नाहीत तर आम्हाला सनदशीर मार्गाने प्रखर आंदोलन करावेच लागेल असा इशारा त्यांनी याप्रसंगी दिला.

आंदोलनाची गरजच भासणार नाही – सौ.कविता शिंपी

यावर उत्तर देताना माध्य.शिक्षणाधिकारी यांनी आंदोलन हा मार्ग आपणास अवलंबण्याची गरज भासणार नाही.मला प्रलंबित कामाची यादी द्या मी स्वतः जातीने लक्ष घालून लवकरात लवकर पूर्ण करुन देते. असे उपस्थित पदाधिकाऱ्यांना त्यांनी ग्वाही देत सकारात्मक भुमिका घेतली.
एकंदरीत ही सहविचार सभा अतिशय खेळीमेळीच्या पध्दतीने पार पडली. सभेचा प्रारंभ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ सुष्मिता चव्हाण यांनी संघटनेच्यावतीने स्वागत केले तर आभार सी.डी.चव्हाण यांनी मानून सभेची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!