*कोंकण Express*
*कणकवली शहरातील प्राथमिक शाळांतून चित्रकलेचा आविष्कार : कलाशिक्षक प्रसाद राणेचा अभिनव उपक्रम*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे उपक्रमशिल कलाध्यापक श्री प्रसाद राणे सर हे चित्रकलेची हुकमत असलेले रसिक जाणकार अध्यापक चित्रकला आणि मूर्तीकला यांचा वारसा वडिलांकडून घेऊन कलाक्षेत्रातील उच्च पदवी संपादन करून विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत कला अध्यापक म्हणून कार्यरत आहेत विद्यामंदिर प्रशालेतील विद्यार्थी कला क्षेत्रात राणेसरांनी उत्कृष्टपणे घडण केली या विद्यार्थांना कलेची अभिरुची निर्माण करण्याची प्रेरणा सरांनी आपल्या अध्यापनातून केली . प्राथमिक शाळेत कला शिक्षकांचा अभाव असतो विद्यार्थी वर्गांना चित्राची गोडी लागावी जीवनातील आनंद प्राप्त व्हावा यासाठी बालवर्गांना चित्रकलेचे प्रत्यक्ष शाळेत जावून अभिरूची निर्माण करणारे विद्यामंदिर प्रशालेचे कलाशिक्षक श्री प्रसाद राणे सर हे चित्रांचा आणि कलेच्या वारसा जतन करून नव्या पढीपर्यंत जोमाने पोहचवत आहेत .
ध्येयाने झपाटलेल्या चित्रकाराला मनापासून शुभेच्छा !!