*कोंकण Express*
*मानसिक आरोग्य व ताणतणावाचे व्यवस्थापन व्याख्यान विद्यामंदीर येथे संपन्न : प्रा . नितीन बांबर्डेकर*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे बॅ नाथ पै बीएड महाविद्यालयाचे मानसशास्राचे प्राध्यापक शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तीमत्व आदर्श पुरस्कार प्राप्त प्राध्यापक नितीन बांबर्डेकर सर यांचे विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य व ताणतणावांचे व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान संपन्न झाले
आजच्या धावपळीच्या युगात विद्यार्थ्याचे मानसिक आरोग्य धोक्यात येत चालले आहे आधुनिक तंत्रज्ञान आणि संगणक मोबाईलचा वाढता वापर या सर्वांमुळे लहान मुलांच्या मनावर विपरित परिणाम घडून येत आहेत . सर्व रोगांवर औषधे आहेत पण मनाचा तोल ढळला तर कोणतेच औषध उपलब्ध नाही यासाठी प्राध्यापक नितिन बांबर्डेकर सर म्हणतात मानसशास्त्राचा आधार घेऊन विविध कसोट्या वापरून मनावरचा ताण कमी करता येतो . सकारात्मक विचार ‘ सुसंगत ‘ आदर्श विचारांच्या ग्रंथांचे वाचन आणि आदर्श सहवास यातूनच माणूस घडत असतो . आज काळ बदलत चालला आहे विद्यार्थी संगतीने अनेक विचाराकडे आकर्षित होत आहे परीक्षा व अभ्यास आई वडिलांचे विचार या दबाव तंत्रामुळे मुलांसमोर अनेक ताणतणाव वाढत आहेत यातून सुटका करून घ्यायची असेल तर मानसिक कसोट्या वापरून त्यातून लवकर बाहेर पडणे महत्वाचे आहेत . प्रा . बांबर्डेकर सरांनी विवेचन पद्धतीने आपल्या सुगम भाषाशैलीने व्याख्यानमाला उत्तमरितीने गुंफली आणि आदर्श विचारांची छाप विद्यार्थीवर्गांवर पाडली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सिंगनाथ सरांनी सुगमवाणीने केले प्रास्ताविक मुख्याध्यापक पी.जे कांबळे सरांनी करून प्रा . बांबर्डेकर सरांचा परिचय करून दिला आभार श्री वणवे सरांनी मांडले या कार्यक्रमाला पर्यवेक्षक सौ जाधव मॅडम ‘ शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते