*कोंकण Express*
*नापणे धबधबा सुशोभीकरणासाठी 1 कोटीचा निधी; माजी आमदार प्रमोद जठार यांचे प्रयत्न…*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
नापणे धबधब्याच्या सुशोभीकरणासाठी सिंधूरन समृद्ध योजनेतून 99 लाख 63 हजार रुपये चा निधीला जिल्हाअधिकारी किशोर तावडे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे याबाबत सिंधूरल समृद्ध समिती सदस्य माजी आमदार प्रमोद जठार यांनी प्रयन केले, नापणे धबधबा सुशोभीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्याने पर्यटकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. त्यामुळे नापणे पर्यटन स्थळ काही दिवसातच विकसित होईल.
नापणे धबधब्याच्या सुशोभीकरणासाठी निधी मिळवा यासाठी सिंधूरल समृद्ध समिती सदस्य प्रमोद जठार आणि स्थानिक आमदार नितेश राणे प्रयन करीत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने 99.63 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून सिंधुरन योजनेतून निधी मंजूर करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.