*कोंकण Express*
*दारू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी येथील एक ताब्यात…*
*राज्य उत्पादन शुल्कची कारवाई; दारूसह गाडी मिळून ४ लाखाचा मुद्देमाल जप्त…*
*बांदा प्रतिनिधी*
बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी इन्सुली राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने सावंतवाडी येथील एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २ लाख ५३ हजाराच्या दारूसह दीड लाखाची गाडी असा एकूण ४ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जुना पत्रादेवी-बांदा रोड, पोस्ट ऑफिसजवळ येथे करण्यात आली. महेश कृष्णा दाभोलकर (रा. सावंतवाडी) असे संशयताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली या पथकाने जुना पत्रादेवी-बांदा रोड, बांदा पोस्ट ऑफिसजवळ येथे सिलव्हर रंगाची मारुती सुझुकी कपनीची अल्टो चारचाकी वाहनाची तपासणी केली असता यात गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे विविध ब्रॅन्डचे ४४ बॉक्स अवैध साठा मिळून आला. या प्रकरणी महेश कृष्णा दाभोलकर याला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्यामध्ये २ लाख ५३ हजाराची दारू व १ लाख ५० हजार किमतीची गाडी असा एकुण ४ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला,
ही कारवाई अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, प्रदीप रास्कर, गोपाळ राणे, दिपक वायदंडे, प्रसाद माळी, रणजीत शिंदे यांनी केली. ये प्रकरणी पुढील तपास प्रदिप रास्कर करीत आहेत.