श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे कॅम्पस इंटरव्ह्यूः ३० विद्यार्थ्यांमधून निवड

श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे कॅम्पस इंटरव्ह्यूः ३० विद्यार्थ्यांमधून निवड

*कोंकण Express*

*श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे कॅम्पस इंटरव्ह्यूः ३० विद्यार्थ्यांमधून निवड*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

युनीकेम प्रा. लिमिटेड गोवा या नामवंत फार्मसीटी कल कंपनीने श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे रसायनशास्त्र विषयातील एम. एस्सी (केमिस्ट्री) व बी. एस्सी (मायक्रोबायोलॉजी, कणकवली कॉलेज) च्या ८ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्यू मध्ये निवड केली.

या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी युनीकेम प्रा. लिमिटेड गोवा या कंपनीच्या क्वालिटी कंट्रोलचे मॅनेजर मा. प्रशांत पेडणेकर व एचआर

विभागाचे सीनिअर ऑफिसर चार्लस मार्टिन महाविद्यायामध्ये स्वतः हजर राहून ३० विद्यार्थाच्या मुलाखती घेतल्या. त्यापैकी ८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप भारमल, प्राध्यापक एम्. ए. ठाकूर, चेअरमन डॉ. बी. एन. हिरामणी,

एम. एस्सी. केमिस्ट्रीचे समन्वयक प्राध्यापक डी. डी. गोडकर, रसायनशास्त्राचे विभाग प्रमुख एस्. एल. वैरागे उपस्थित होते. श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा रसायनशास्त्र विभाग व प्लेसमेंट सेल आशा प्रकारे अनेक कंपन्यांचे महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करून रसायनशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत असतात. यामध्ये विशेष करून लक्ष्मी ऑरगॅनिक, फिनोलेक्स, सिप्ला, व्हिनस इथॉक्सी इथर, टेराफार्मा, निकोमेट, टेवाफार्मा, गणेशा पर्सनल केअर प्रॉडक्ट्स या विविध कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून नोकरीची संधी मिळते. वरील कंपन्यांमध्ये रसायनशास्त्र विभागाचे अनेक विद्यार्थी उच्च पदावरती कार्यरत आहेत.

या प्रसंगी बोलताना एचआर विभागाचे सीनिअर ऑफिसर चार्लस मार्टिन यांनी सध्या आपल्या कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीच्या विद्यार्थाच्या कामाचे विशेष कौतुक केले. त्यामुळे आम्ही या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यू घेताना प्रथम प्राध्यान्य देतो असे सांगितले. क्वालिटी कंट्रोल चे मॅनेजर प्रशांत पेडणेकर यांच्या प्रयत्नातून या कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन करण्यात आले. यावेळी विपुल नाईक गांवकर, हरीप्रसाद कर्पे, ऋषिकेश पावसकर, श्रेयस गांवकर,

फेलसी फरनाडिस, साक्षी गवंडे, श्रेयस कुंभार, ऋत्विक उबळकर

यां विद्यार्थ्यांनची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनचे संस्थाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे भोंसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, या प्रसंगी प्राचार्य दिलीप भारमल, एम. एसस्सी समन्वयक प्राध्यापक दिलीप गोडकर, विभाग प्रमुख प्राध्यापक एस. एल. वैरागे उपस्थित होते. यावेळी डॉ. डी. बी. शिंदे, डॉ. यु. सी. पाटील, डॉ. ए. पी. निकुम, डॉ. वाय. ए. पवार, प्रा. डी. के. मळीक, प्रा. पी. एम. धुरी, प्रा. पी. पी. परब, प्रा. डी. जी. मोर्ये, प्रा. एस. एस. काळे व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!