*कोंकण Express*
*कणकवली बांधकार वाडीत दोघांना मारहाण…*
*अन्य तालुक्यातून आलेल्या व्यक्तींनी मारहाण केल्याची शक्यता…*
कणकवली, ता. ११: शहरातील बांधकरवाडी श्रीराम नगर येथे रहिवाशी असलेल्या चेतन पवार (वय २५) आणि येथेच भाड्याने राहणाऱ्या सुनील चव्हाण याला अन्य तालुक्यातून आलेल्या काही व्यक्तींनी तीन गाड्या घेऊन येत दांड्याने व दगडाने मारहाण केली.
यामध्ये त्या चेतन पवार याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला ७ टाके पडले. तर सुनील चव्हाण यांना किरकोळ मार लागला. ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास जुना नरडवे रोड येथील दत्तकृपा निवारा शेड जवळ घडली, त्या ठिकाणी दुचाकी देखील होती त्याचे नुकसान त्या सात ते आठ जणांनी केले आहे.