सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव एमएसएमई – टीसी सिंधुदुर्ग भूमिपूजन व प्रधानमंत्री विश्वकर्मा स्वरोजगार संमेलन शुभारंभ केंद्रीयमंत्री माननीय नारायणराव राणे यांच्या शुभहस्ते संपन्न

सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव एमएसएमई – टीसी सिंधुदुर्ग भूमिपूजन व प्रधानमंत्री विश्वकर्मा स्वरोजगार संमेलन शुभारंभ केंद्रीयमंत्री माननीय नारायणराव राणे यांच्या शुभहस्ते संपन्न

*कोंकण Express*

*सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव एमएसएमई – टीसी सिंधुदुर्ग भूमिपूजन व प्रधानमंत्री विश्वकर्मा स्वरोजगार संमेलन शुभारंभ केंद्रीयमंत्री माननीय नारायणराव राणे यांच्या शुभहस्ते संपन्न*

कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि देशातील प्रमुख औद्योगिक जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्गचा समावेश करण्यासाठी आज सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सवातील एमएसएमई तंत्रज्ञान केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्यात सहभागी झालो.
सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव एमएसएमई – टीसी सिंधुदुर्ग भूमिपूजन व प्रधानमंत्री विश्वकर्मा स्वरोजगार संमेलन शुभारंभ केंद्रीयमंत्री माननीय नारायणराव राणे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

या सिंधुदुर्गमधील तंत्रज्ञान केंद्रासाठी १८२ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

एमएसएमई मंत्रालयाच्या वतीने देशभरात २० तंत्रज्ञान केंद्रे आणि सुमारे १०० विस्तार केंद्रे स्थापन करत असून या प्रकल्पासाठी एकूण ३५०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

प्रत्येक तंत्रज्ञान केंद्रातून दरवर्षी १० ते १५ हजार बेरोजगार तरुण आणि कामगारांना प्रशिक्षण देऊन त्यांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.

या तंत्रज्ञान केंद्रामुळे राज्यातील दोन लाखांहून अधिक औद्योगिक घटकांसाठी फायदेशीर ठरणार आहे तसेच आजूबाजूच्या रत्नागिरी आणि रायगड जिल्हे वरदान ठरतील.

यावेळी माजी खासदार माननीय निलेशजी राणे,विकास आयुक्त डॉ. रजनीश कुमार, एमएसएमई अतिरिक्त उपायुक्त श्रीमती सुधा केशरी, इरकॉन महाव्यवस्थापक मसुद ऐहमद, जिल्हा अधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष श्री.मनीष दळवी, माजी आमदार श्री.राजन तेली,श्री.अजितराव गोगटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!