*कोंकण Express*
*गांधीनगर कणकवली येथे धरणाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन*
दिनांक 9रोजी दुपारी 3वाजता गांधीनगर येथे धरणाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी कणकवली देवगड विधानसभा मतदार संघाचे आमदार कार्यसम्राट श्री.नितेश राणे साहेब, माजी जी. प.अध्यक्ष श्री.संदेश उर्फ gotya सावंत, माजी जी.प. अध्यक्ष सौ.संजना सावंत,सरपंच श्री.मंगेश bobhate,उपसरपंच श्री.राजेंद्र सावंत, माजी सभापती श्री.सुरेशजी सावंत, दादा सावंत,आबा सावंत,रमेश सावंत,संतोष सावंत,कांता सावंत,सुनील सावंत,राजा सापळे,गांधीनगर ग्रामपंचायत सदस्य व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना संदेश सावंत यांनी सांगितले की भाजप पक्ष्यात एक वर्षापूर्वी मी शब्द दिला होता की विकासाची गंगा माननीय आमदार श्री.राणे साहेब यांच्या माध्यमातून आणणार,आणि इतर कामे मी आणली आणि या वर्षातले मोठे काम म्हणजे 95कोटींचे धरणाचे अधिकृत भूमिपूजन केले आहे.नुसत्या वल्गना केल्या नाही.नंतर आमदार साहेबांनी या gavasathi धरण आणण्यासाठी कसा पाठपुरावा करून,याच महिन्यात वर्क ऑर्डर आणून आज भूमिपूजन करून दीलेल्याशब्दाला राणे फॅमिली jagate हे सांगितले,याही पुढे अनेक कामे मी करीन हे आश्वासन दिले.यावेळी श्री.अशोक कांबळे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले