फोंडाघाट पंचक्रोशीच्या वतीने सभापती मनोज रावराणे यांचा झाला नागरी सत्कार

फोंडाघाट पंचक्रोशीच्या वतीने सभापती मनोज रावराणे यांचा झाला नागरी सत्कार

*कोकण Express*

*फोंडाघाट पंचक्रोशीच्या वतीने सभापती मनोज रावराणे यांचा झाला नागरी सत्कार…!*

सभापती मनोज रावराणे कणकवली पंचायत समितीत आदर्श काम करतील – आम. नितेश राणे

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली पंचायत समितीच्या प्रत्येक सभापतींनी विविध योजना राबवून चांगलेच काम केले आहे. नवनिर्वाचित सभापती मनोज रावराणे सुद्धा हा विकासाचा वारसा पुढे चालू ठेवतील आणि कणकवली पंचायत समितीचे नाव आदर्श पंचायत समिती म्हणून राज्यात आणि देशात करतील असा विश्वास भाजपा आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. सभापती मनोज रावराणे यांचा फोंडाघाट पंचक्रोशीच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी आम.नितेश राणे बोलत होते.

शाल श्रीफळ,श्रीगणेशाची मूर्ती,सन्मान चिन्ह देऊन मनोज रावराणे यांचा नागरी सत्कार आम.नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, भाजपा ग्रामीण मंडल अध्यक्ष संतोष कानडे, भाजपा मंडल शहर अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा परिषद सदस संजय देसाई, तुळशिदास रावराणे, पंचायत समिती सदस्य प्रकाश पारकर, दिलीप तळेकर, सुजाता हळदीवे, म्याक्षी पिंटो, दामोदर नारकर, आण्णा तेंडुलकर, असलदे सरपंच पंढरी वायगणकर, करूळ सरपंच श्री कर्णिक, उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांचे स्वागत लोरे नं.१ सरपंच अजय रावराणे, वाघेरी सरपंच संतोष राणे, फोंडाघाट

सरपंच संतोष आग्रे, घोणसरी सरपंच सौ. मृणाल पारकर, पियाळी सरपंच सौ. पवित्रा गुरव, फोंडा शक्तीकेंद्र प्रमुख विश्वनाथ जाधव, लोरे शक्तीकेंद्र प्रमुख नरेश गुरव, लोरे उपसरपंच अनंत रावराणे, यांनी केले. तर संतोष कानडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्थाविक केले.

कणकवली सभापती म्हणून निवड झालेल्या मनोज रावराणे यांच्या यशाबद्दल सर्वांनाच खात्री आहे. आज या व्यसपीठावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आहेत. प्रत्येकाला पद देऊन काम करण्याची संधी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिले. त्याच पद्धतीने मनोज रावराणे यांच्याही कार्याचा ठसा उमटेल. मनोज रावराणे यांना प्रामाणिक कार्याची पोच सभापती पदाच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांनी दिली असल्याचे आमदार श्री राणे यांनी सांगितले.

मनोजराव हे चांगले संस्कर असलेले व्यक्तिमहत्व आहे. २०२२ च्या निवडणूक १७ ही सदस्य निवडून येतील. असा विश्वास व्यक्त करतांनाच प्रत्येक सभापती ने आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.त्याची पोच जनतेतून मिळेल असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. माझ्या कणकवलीत पंचायत समितीत मला तरुण सहकारी मिळालेत जे नेहमीच नवनवीन उपक्रम राववितात याचा मला अभिमान वाटतो .असे ते म्हणाले.

सरकारी निधीवर सर्वस्वी अवलनबुन नराहता. नवे धोरण स्वीरा.आपण जनतेचे प्रश्न सोडवितांना भाजपाचे आहेत ,तुमच्या कार्यातून भाजपा पक्ष घराघरात मजबूत करा.आपण माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेबांचे कार्यकर्ते आहात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!