*कोंकण Express*
*सोशल मिडीया फ्रंट कोकण विभागीय अध्यक्षानी घेतली शरदचंद्र पवार यांची भेट*
सुप्रीया सुळे यांच्या भोर येथील सभेला शरदचंद्र पवारसाहेब जात असताना सोशल मिडीया फ्रंट कोकण विभागीय अध्यक्ष प्रा.सचिन पाटकर व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संजय भाईप यांनी घेतली भेट. संजय भाईप / ( सावंतवाडी ) लोकसभा निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षानी कंबर कसली आहे.सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची ताकत वाढली आहे. पक्षप्रवेशासाठी ईच्छुकांची संख्या वाढली आहे.सर्वच सेलचे पदाधीकारी जोमाने कामाला लागले आहेत.सोशल मिडीया फ्रंट कोकण विभागीय अध्यक्ष सचीन पाटकर,सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संजय भाईप यांनी जोरदार बांधणी सुरू केली आहे.तुतारी तळागाळापर्यत पोचवण्यासाठी सोशल मीडीयाच्या माध्यमातून बाधंणीला सुरूवात केली आहे. सुप्रीया सुळे याच्या सभेला शरदचंद्र पवार साहेब जात असताना माधवबाग ( पुणे ) येथे सदिच्छा भेट घेतली.तसेच सोशल मिडीया फ्रंट च्या पदाधीकार्याच्या भेटी घेवुन पक्ष चिन्ह तसेच लोकसभा निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली.यावे॓ळी युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर,बांदा शहर अध्यक्षा सुनिता भाईप याही उपस्थित होत्या.

