*कोंकण Express*
*माऊली मित्र मंडळा अनोखा उपक्रम*
*कणकवली ः प्रतिनिधी*
दिनांक ०८/०३/२०२४ रोजी “महाशिवरात्रीचे औचित्य साधून, माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत कणकवली बस स्थानक येथे कुणकेश्वर यात्रेत सहभागी होण्यासाठी S T बसने प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना पाणी वाटप,
*यावेळी माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे सल्लागार दादा कुडतरकर, संजय मालंडकर, सुभाष उबाळे , आगार व्यवस्थापक अजय गायकवाड, माऊली मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य अविनाश गावडे, भगवान कासले, प्रभाकर कदम, बाबुराव घाडीगावकर, सईद नाईक, संदिप गोळवणकर, यांच्या हस्ते पाणी वाटप करण्यात आले,
*यावेळी दादा कुडतरकर यांनी माऊली मित्र मंडळाचे नानाविध कार्यक्षेत्रात सतत कार्य सुरूच असते, त्याच प्रमाणे आज हा महाशिवरात्रीच्या निमित्ताने कुणकेश्वर यात्रेला जाणाऱ्या भाविक भक्तांकरीता पाणी वाटप करण्याचे कार्य कौतुकास्पद असुन, संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर, संजय मालंडकर यांचे, माऊली मित्र मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांच्या बद्दल गौरवोद्गार व्यक्त केले,
*आधारस्तंभ अशोक काका करंबेळकर,सर्व सल्लागार यांच्या संकल्पनेतून , माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळांच्या पदाधिकारी व सदस्य यांच्या सहकार्याने आम्ही सर्व च क्षेत्रात कार्यरत आहोत, असे राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले,
*कणकवली तील च नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संघटनांनी अशा वेगवेगळ्या प्रकारे कार्य केले तर आपल्या गावचा किंबहुना महाराष्ट्र राज्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे हि ते म्हणाले,
*S T चे आगार व्यवस्थापक अजय गायकवाड, स्थानक प्रमुख प्रदीप परब, बी जी चव्हाण, सदानंद नांदोस्कर, उमेश बोभाटे, बाबु मुळदेकर, दशरथ साटम, सर्व वाहतूक नियंत्रक , चालक सचिन मर्ये, वाहक उमेश चौगुले, चालक लवू वाळके, वाहक सतिश माने आदी उपस्थित होते,
*वाहतूक नियंत्रक उमेश बोभाटे यांनी माऊली मित्र मंडळाच्या उपक्रम राबविले बद्दल कौतुक केले, आभार व्यक्त केले,
*चालक , वाहक, समस्त कुणकेश्वर यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंनी समाधान व्यक्त केले, माऊली मित्र मंडळांने उपक्रम राबविले बद्दल आभार व्यक्त केले