जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नारी शक्ती चा सन्मान

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नारी शक्ती चा सन्मान

*कोंकण Express*

*जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नारी शक्ती चा सन्मान*

*कणकवली ः प्रतिनिधी*

दिनांक ०८/०३/२०२४ रोजी “जागतिक महिला दिनाचे” औचित्य साधून, संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या माऊली मित्र मंडळाचे वतीने, कणकवली पोलीस ठाण्यातील PSI वृषाली बरगे यांना सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले,

*कणकवली पोलीस निरीक्षक एस एच तडवी साहेब, सहायक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, पोलीस उपनिरीक्षक हाडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, पो. हे. कॉ. पांढरे, किरण मेहते, सुपल, कोलते, जाधव आदी उपस्थित होते,

*यावेळी कणकवली पोलीस ठाण्यातील महिला पो. हवालदार स्मिता माने, पो. नाईक उज्वला मांजरेकर, पो. कॉन्स्टेबल प्रणाली जाधव, पो. कॉन्स्टेबल तृप्ती कुळये,महिला होमगार्ड जयश्री कट्टीमणी आदी उपस्थित होत्या,

*सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर यांनी मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की, आज जागतिक महिला दिन त्यानिमित्ताने आम्ही माऊली मित्र मंडळाचे वतीने हा नाही शक्तीचा सन्मान सोहळा आयोजित केला, ज्याप्रमाणे पुरुष पोलीस कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत असतात त्याप्रमाणे आमच्या महिला पोलीस चौवीस तास कार्यरत असतात, आणि म्हणून च आम्ही आज महिला पोलीस निरीक्षक वृषाली बरगे यांना सन्मानित केले,

*संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की, नारी शक्ती चा सन्मान करणे हे आमचेच नव्हे तर समस्त पुरुष वर्गाने नारी हि आदिशक्ती चेच रूप आहे, असे मानून तिचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य च आहे,

*यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर यांनी उपस्थित माऊली मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांच्या कौतुक व्यक्त केले,

*अविनाश गावडे भगवान कासले प्रभाकर कदम सईद नाईक प्रसाद पाताडे प्रसाद उगवेकर लक्ष्मण महाडिक बाबुराव घाडीगावकर हेमंत नाडकर्णी विशाल रजपूत आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!