*कोंकण Express*
*परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचा रविवारी विद्यार्थी गुणगौरव सोहळा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या शैक्षणिक मंडळातफे आयोजित जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार 10 मार्च रोजी सकाळी 10 वा. परमहंस भालचंद्र महाराज संस्थान, कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रम काशीभवन भक्तनिवासमधील सभागृहात होणार आहे. यावेळी पूर्व माध्यमिक (8 वी) मधील 20 गुणवंत व पूर्व उच्च प्राथमिक (5 वी) मधील 21 गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यात आला असून सर्व विद्यार्थ्यांनी पालकांसह वेळीच उपस्थित राहावयाचे आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत भूषवणार असून यावेळी संस्थानचे विश्वस्त व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन शैक्षणिक मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.