लोरे नं १ गावातील मा. नितेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून मंजूर विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

लोरे नं १ गावातील मा. नितेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून मंजूर विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

*कोंकण Express*

*लोरे नं १ गावातील मा. नितेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून मंजूर विकास कामांचे भूमिपूजन संपन्न*

ग्रामपंचायत लोरे नं १ व मा. मनोज तुळशीदास रावराणे ( माजी सभापती कणकवली )यांच्या पाठपुराव्यामुळे कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघांचे लोकप्रिय, कार्यसम्राट आमदार मा. नितेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून लोरे गावातील आद्य देवस्थान श्री. देव गांगो रुजेश्वर मंदिरातील परिसर सुशोभीकरण करणे यासाठी रु.२५ लाख निधी, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष मा. श्री. तुळशीदास रावराणे यांच्या पाठपुराव्यामुळे लोरे तलाठी कार्यालयाला रु.२५ लाख चा निधी ( या कार्यालयासाठी श्री तुळशीदास रावराणे यांनी आपल्या स्वतःच्या मालकीची जमीन विनामूल्य उपलब्ध करून दिली) व लोरे नं १ कुंडलवाडी रस्त्यासाठी रु.४०लाख चा निधी प्राप्त झाला होता या कामांचे भूमिपूजन दि.०९ मार्च २४ रोजी कार्यसम्राट आमदार मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या उद्घाटन प्रसंगी सिंधुदुर्ग कृषि उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष मा.तुळशीदास रावराणे,राजन चिके,कणकवली माजी सभापती मनोज रावराणे,भाजपा ग्रामिण तालुका अध्यक्ष संतोष कानडे,लोरे सरपंच अजय रावराणे, उपसरपंच सुमन गुरव,भाजपा शक्ती केंद्र प्रमुख नरेश गुरव, व गावातील बहुसंख्य ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. लोरे गावाच्या विकासा साठी सदैव व तत्परतेने निधी उपलब्ध करून देत असल्या बद्दल आमदार मा. नितेशजी राणे साहेब यांचे आभार सरपंच अजय तुळशीदास रावराणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!