*कोकण Express*
*नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्तांचे सलग तिस-या दिवशीही उपोषण सुरुच….*
*यापुढील उपोषण अधिक तीव्र करण्याचा निर्धार..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पबाधित नवीन कुर्ली गावातील प्रकल्पग्रस्तांचे *स्वतंत्र ग्रामपंचायत,पर्यायी शेजजमिन व वसाहतीतील प्रमुख १८ नागरी सुविधा मागणीसंदर्भात* गेले दोन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेले उपोषण आज तिस-या दिवस संपेअखेरही सुरुचं आहे. आज तिस-या दिवसाच्या उपोषणाची सुरुवातचं मोठमोठ्या आवाजात घोषणा देत ताट,थाळी वाजवुन करण्यात आली.
*नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळा* च्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिनापासुन प्रकल्पग्रस्तांचे उपोषण सुरु आहे, दरम्यान प्रजासत्ताक दिनी *पालकमंत्री नाम. उदय सामंत* यांनी ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करु व नागरी सुविधाबाबत समस्या प्रशासन पातळीवर सोडविण्याचे आश्वासन केले होते परंतु आज उपोषणाचे तीन दिवस पुर्ण झाले तरी या आश्वासनाचे लेखी पुर्तता संबंधित प्रशासन पातळीवरुन देण्याबाबत कोणत्याचं हालचाली नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी उपोषण सुरुचं ठेवले आहे..
आज जिल्हा नियोजन मंडळाची सभा सिंधुदुर्गनगरी येथे पार पडली या सभेतही नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाचा प्रश्न ऐरणीवर आला *दरम्यान माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर आक्रमक भुमिका मांडुन नवीन कुर्ली येथे त्वरीत स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यासाठी थेट आदेश द्या अशी सुचना देखिल केली. तसेच प्रमुख नागरी सुविधा कामाची गावठणात सुरुवात करावी अशी मागणी केली.*
आजच्या दिनी *आमदार नितेश राणे* यांनी प्रकल्पग्रस्त उपोणकर्त्याना भेट देवुन प्रलंबित मागण्यासंदर्भात शासकीय कार्यालयाकडुन योग्य ती कार्यवाही व्हावी याबाबत आपण पाठपुरावा करु परंतु प्रशासनाकडुन योग्य लेखी उत्तर न आल्यास किंवा प्रकल्पग्रस्तांचे योग्य समाधान न झाल्यास आपण एकमताने पुढील दिशा ठरवु असे सुचित केले. तसेच *युवा नेते तथा जिल्हा नियोजन विशेष निमंत्रित समिती सदस्य संदेश पारकर* यांनी उपोषणकर्त्याना भेट देवुन व्यथा जाणुन संबंधित खात्यातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी थेट दुरध्वनीद्वारे संपर्क साधला परंतु चर्चेअंती प्रकल्पग्रस्तांचे कोणतेचं समाधान न झाल्याने उपोषणकर्त्ये यापुढेही उपोषणावर ठाम राहिले असुन शासन स्तरांवर यापुढे कोणती दखल न घेतल्यास यापुढील उपोषण अधिक तीव्र करण्याचा निर्धार उपस्थित प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला. *आजही मोठ्या उपस्थितीत प्रकल्पग्रस्त उपोषणकर्त्याना पाठिंबा देत होते विशेष म्हणजे महिला वर्गाची उपस्थिती लक्षणिय होती.*