उद्धव ठाकरे आता तुरुतुरु फिरतात,मात्र जनतेला गरज होती तेव्हा गळ्याला बेल्ट लावण्याची नौटंकी केली

उद्धव ठाकरे आता तुरुतुरु फिरतात,मात्र जनतेला गरज होती तेव्हा गळ्याला बेल्ट लावण्याची नौटंकी केली

*कोंकण Express*

*उद्धव ठाकरे आता तुरुतुरु फिरतात,मात्र जनतेला गरज होती तेव्हा गळ्याला बेल्ट लावण्याची नौटंकी केली*

*आमदार नितेश राणे यांचा घणाघात*

*स्वतःच्या मुलाला वरळीतून निवडून आणून दाखवा*

*बंटी आणि बबली राज्यात दौरा करत आहेत त्यांना जनता गांभीर्याने घेत नाही*

*कणकवली ः प्रतिनिधी*

भांडुपच्या देवानंद संजय राऊत लाचारीची भाषा करतो. लाचारीच दुसरं नाव म्हणजे उद्धव ठाकरे आहे. १० जनपथ वर बसलेल्या मम्मी समोर किती झुकाव लागत हे येणाऱ्या निवडणुकीत दिसेल. उध्दव ठाकरे यांनी स्वतःच्या मुलाला वरळीतून निवडून आणून दाखवावे आणि मग नितीन गडकरी साहेबांबद्दल बोल.उद्धव ठाकरे आता तुरुतुरु फिरतोय जनतेला गरज होती तेव्हा गळ्याला बेल्ट लावण्याची नौटंकी केली आणि मातोश्री लपून बसले.अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.ते कणकवलीत प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलत होते.
काही दिवसांपासून बंटी आणि बबली राज्यात दौरा करत आहेत. सगळीकडे फिरून भाजपावर गरळ ओकण्याशिवाय दुसरं काही करत नाहीत.रश्मी वहिनी जेवढ्या उद्धव ठाकरेंसोबत फिरत नाय तेवढी ही बबली फिरत आहे.”ये रिशता क्या केहलता है.”संशय निर्माण होत आहे.बंटी आणि बबली यांच्या समोर बसलेली गर्दी दाखवा,चार टाळकी सभेला नसतात. उबाठा पक्षाला कोणीही गांभीर्याने घेत नाही.अशा शब्दात त्यांची खिल्ली उडविली.
चोरांचा सरदार अशी टीका करणाऱ्या राऊत च्या मालकाचा मातोश्री २ फडणवीस साहेबांमुळे पूर्ण झाला हे विसरू नका. तुझा मालकाच्या आजू बाजूला नपुसकच जास्त आहेत त्यांना नपुंसकांचा सरदार म्हंटले तर तुला बरे वाटेल काय ? त्यामुळे तोंड सांभाळून बोल असा इशाराही यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.
चोऱ्या करायच्या शेतकऱयांचे पैसे लुटायचे आणि विचारलं तर त्याला छळ म्हणायचं व्यवसाय आम्ही करतो आणि सगळे कर भरतो. रोहित पवार ने उत्तर द्यावे घाबरायचं का? असा सवाल केला.महाविकास आघाडीच्या बैठका होतात तेव्हा हड्डी कोणाला फेकतात हे उद्धव ठाकरे दिल्लीला १० जनपथ वर जाणार आहेत. तेव्हा कळेल असे सांगितले.प्रकाश आंबेडकर ज्या जगा जिंकणार नाहीत त्याच जागा त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहेत.ज्या ठिकाणी आंबेडकरी मतदार जास्त आहे त्या जागा ते प्रकाश आंबेडकर यांना देत नाहीत.आंबेडकर नावासाठी प्रकाशजींनी योग्य निर्णय घ्यावा.असे आवाहन केले.
महाविकास आघाडीची सत्ता असताना काँग्रेस ने किती शाखा घेतल्या त्याची लिस्ट जाहीर करावी लागेल. लोढांचं नाव घेऊन खडी फोडू नका. तेव्हा लोढा चालत होते आता का द्वेष करता असेही ते म्हणाले. हिंदुत्वच्या नावाने राज साहेब येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे.थोड्या दिवसात समजेल कोल्हापूरची जनता महायुतीच्या बाजूने उभी राहतील. संजय राऊत १० जनपथ ला जाऊन काय घासतात, कोणाच्या पाया पडतात त्याची माहिती फोटो सहित द्यावी लागेल. तुमच्या घरात काय जळतय हे पहा. उद्धव ठाकरेंच्या कामगार संजय राऊत ला कोणी स्वीकारत नाही. ही घाण कोणाला नकोय. त्याने स्वतःची लाल करायची बंद करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!