माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न

*कोंकण Express*

*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न*

*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे गुरुवार दिनांक ०७ मार्च २०२४ रोजी नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न करण्यात आला.*

*या भूमिपूजन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे सन्मा.श्री विनायकजी राऊत (खासदार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदार संघ) यांच्या शुभहस्ते करण्यात आला, या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाध्यक्ष सन्मा. श्री. सतीशजी सावंत (अध्यक्ष, क. ग. शि. प्र. मंडळ, मुंबई) सन्मा. श्री. शिवाजी सावंत ( सरचिटणीस, क.ग.शि.प्र. मंडळ, मुंबई), सन्मा.श्री प्रकाश सावंत (खजिनदार क.ग.शि.प्र. मंडळ, मुंबई), सन्मा.श्री.पी.डी.सावंत (उपाध्यक्ष क.ग.शि.प्र.मंडळ, मुंबई), सन्मा.श्री.संजय सावंत, सन्मा. श्री. सुधिर सावंत, सर्व पदाधिकारी, तसेच शालेय समिती चेअरमन सन्मा.श्री.आर.एच. सावंत, शालेय समिती खजिनदार सन्मा.श्री. गणपत सावंत, सन्मा.श्री. बावतीस घोन्सालविस, सर्व शालेय समिती सदस्य, बी.ई.सिव्हिल इंजिनियर सन्मा. श्री.अभिषेक नाईक, सन्मा. श्री. सुशांत नाईक, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक सन्मा.श्री. बयाजी बुराण, तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्रशालेतील विद्यार्थ्यी, कनेडी, सांगवे, भिरवंडे परिसरातील प्रतिष्ठित ग्रामस्त उपस्थित होते*.

*या प्रसंगी प्रमुख पाहुणे सन्मा.श्री. विनायकजी राऊत यांनी आपले मत व्यक्त करताना ग्रामीण भागातील शिक्षण संस्थेमध्ये योगदान देण्याचे अनमोल कार्य लाभले,या शुभकार्यासाठी खासदार निधीतून पहिल्या टप्प्यात १७ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले. ग्रामीण भागातील मराठी शाळा चालवणे आणि टिकवणे किती कष्ट प्रत असते. विद्यार्थी प्रिय शाळा ह्या स्पर्धात्मक जीवनामध्ये टिकून राहतात. विद्यार्थ्यांना परीक्षार्थी न बनवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेने व प्रशालेने दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले आहे, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या संस्थेची कारकीर्द सुरु झालेली आहे. मुख्यमंत्री, “माझी शाळा, सुंदर शाळा” या उपक्रमामध्ये प्रशालेने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला ही उल्लेखनीय बाब आहे*.

*या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन मा.श्री. प्रसाद मसुरकर (सहा. शिक्षक माध्यमिक) यांनी केले*.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!