सावंतवाडीत ५ वी जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडीत ५ वी जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन

*कोंकण Express*

*सावंतवाडीत ५ वी जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन*

*सावंतवाडीत ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनची ५ वी इंडियन ऑईल वरिष्ठ जिल्हा अजिंक्यपद व आंतर क्लब ( तालुका ) कॅरम स्पर्धा दि. ८-९-१० मार्च २०२४ रोजी श्री पंचम खेमराज महाविद्यालय बॅडमिंटन हॉल, सावंतवाडी येथे संपन्न होणार आहे.
ही स्पर्धा पुरुष एकेरी, महिला एकेरी, वयस्कर पुरुष एकेरी व आंतर क्लब ( तालुका ) अशा विविध गटांमधे खेळविण्यात येईल.
या स्पर्धेमधे सहभागी होण्यासाठी खालील तालुका प्रतिनिधींमार्फत बुधवार दि. ६ मार्च २०२४ पर्यंत आपल्या प्रवेशिका शुल्कासह द्याव्यात.
राजेश निर्गुण, सावंतवाडी
शुक्राचार्य म्हाडेश्वर, कुडाळ
पांडुरंग पाताडे, कणकवली
किरण मालवणकर, मालवण
प्रकाश प्रभू, देवगड
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क पुरुष एकेरी, महिला एकेरी, वयस्कर पुरुष एकेरी रु.१५०/-
जिल्हा नोंदणी शुल्क सन २०२३-२४ रु. १००/-
सांघिक रु. ५००/-
स्पर्धा अखील भारतीय कॅरम महासंघाच्या प्रचलीत नियमावलीनुसार खेळविण्यात येतील. प्रत्येक खेळाडूने स्पर्धा नियमावलीनुसार पांढरा टी शर्ट व फूलपँट घालून सामने खेळणे अनिवार्य आहे.
ही स्पर्धा इंडियन ऑईल कॉर्पो. लि. ने पुरस्कृत केली असून विजेत्यांना रोख रकमेची पारीतोषिके व आकर्षक चषक देण्यात येतील.
अधिक माहितीसाठी योगेश फणसळकर ( ७६२०७५५७६६ ) यांच्याशी संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!