*कोकण Express*
*कणकवलीत नीलेश राणे यांचे जंगी स्वागत*
*नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली नगरीत आज जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.निलेश राणे यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड झाल्यानंतर प्रथमच कणकवलीत आलेल्या निलेश यांच्या स्वागतासाठी फटाक्याच्या आतिषबाजी करण्यात आली.कणकवली नरडवे नाका येथे माजी खासदार निलेश राणे यांचे ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करत पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन ही करण्यात आले. यावेळी भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी जि. प अध्यक्ष गोट्या सावंत,प. स. सभापती मनोज रावराणे,भाग्यलक्ष्मी साटम,संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री,नगरसेवक अभि मुसळे,बंडू गांगन,मेघा गांगण,किशोर राणे,संजय कामतेकर,बाबू गायकवाड, शिशिर परुळेकर, विराज भोसले, प्रकाश पारकर,गणेश तळगावकर,सोनू सावंत,अण्णा कोदे, व बहुसंख्य भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.