*कोंकण Express*
*शिवसेना कुडाळ मालवण विधानसभेच्या प्रवक्तापदी रत्नाकर जोशी यांची नियुक्ती*
कुडाळ येथील श्री. रत्नाकर बबन जोशी यांची वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननीय श्री. एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या कुडाळ-मालवण विधानसभेच्या प्रवक्तापदी आज गुरुवारी दिनांक 29.02.2024 रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आग्रे यांनी जोशी यांना कुडाळ येथील शिवसेना शाखा कार्यालयात तसे जोशी यांना नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती जाहीर केली आहे. वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण यांचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वाना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास ठेऊन नियुक्ती करण्यात आली आहे. आणि जोशी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आग्रे, महिला जिल्हा प्रमुख वर्षाताई कुडाळकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी सचिव सन्माननिय किसन मांजरेकर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खजिनदार सन्माननिय भास्कर राणे, जिल्हा संघटक रुपेश पावसकर, उप जिल्हा प्रमुख शेखर राणे, मालवण उप तालुका प्रमुख अरुण तोडणकर तसेच कुडाळ तालुका प्रमुख योगेश तुळसकर, तालुका प्रमुख अरविंद करलकर, कुडाळ महिला तालुका प्रमुख सौ. सिद्धी शिरसाट, महिला तालुका प्रमुख दिक्षा सावंत, कुडाळ शहर प्रमुख नागेश नेमळेकर, उप तालुका प्रमुख अनघा रांगणेकर, विभाग प्रमुख अग्रवाल, शिवसेना पावशी विभाग प्रमुख जयदीप तुळसकर, शिवसैनिक रामकृष्ण गडकरी, शिंदे, सौ. आराध्या करलकर, शिल्पा अन्य उपस्थित होते.