मालवणी स्वाद’ रेसिपी स्पर्धेला मिळतोय भरभरून प्रतिसाद ; सिंधुदुर्ग लाईव्ह आणि लुपिन फाऊंडेशनचा रेसिपी शो
सिंधुदुर्ग, दि. १२ : जिल्ह्यात प्रथमच ‘मालवणी स्वाद’ ही डिजिटल रेसिपी स्पर्धा होतेय. कोकणच महाचॅॅनेल सिंधुदुर्ग लाईव्ह आणि लुपिन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या रेसिपी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलय. स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. हा वाढता प्रतिसाद पाहता स्पर्धेची अंंतिम तारीख ३० सप्टेंबर करण्यात आली. ‘मालवणी स्वाद’च्या माध्यमातन कोकणातल्या मागे पडलेल्या मालवणी रेसिपीजना यामुळे पुन्हा एकदा उर्जितावस्था मिळणार आहे. तसेच, तुमच्या हटके आणि भन्नाट मालवणी रेसिपी जगभर पोहचतील. म्हणूनच, कोकणच महाचॅॅनेल सिंधुदुर्ग लाईव्ह आणि लुपिन फाऊंडेशनने खास तुमच्यासाठीच मालवणी स्वाद या डिजिटल रेसिपी स्पर्धच अगदी निशुल्क आयोजन केलय. तुमच्या पदार्थांच्या आकर्षक सादरीकरणासहित तुमच्या मोबाईलवर केलेले व्हिडीओ ३० सप्टेंबर पर्यंत सिंधूदुर्ग लाईव्ह, लुपिन फाऊंडेशनकडे पाठवायचे आहेत. हे व्हिडीओ 7720096038 या नंबरवर पाठवायचे आहेत. स्पर्धेसाठी तुम्ही केलेला पदार्थ काळाच्या पडद्याआड गेलेला असल्याच प्राधान्य देण्यात येईल. तुम्ही केलेला पदार्थ पौष्टिक असावा. तुमच्या पदार्थच सादरीकरणही विचारात घेतल जाईल. तसेच तुमचा पदार्थ गृह – लघु उद्योगास वाव देणारा असावा. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सर्व स्पर्धकातून २० स्पर्धकांची निवड विशेष सादरीकरणासाठी केली जाईल, २० स्पर्धकांचे २ गट करून प्रत्यक्ष स्पर्धा या २० स्पर्धकातून १० स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड होईल, या १० स्पर्धकांच्या घरी जाऊन घरी जाऊन किंंवा एखाद्या चांगल्या लोकेशनवर जाऊन तुमच्या आकर्षक सादरीकरणासहित त्याचे प्रोफेशनल चित्रीकरण करून त्याचे एपिसोड सिंधुदुर्ग लाईव्हवर प्रसारीत करण्यात येतील. यातून ५ अंतिम विजेत्यांची निवड होणार असून पहिले तीन तसेच २ उत्तेजनार्थ रेसिपी निवडण्यात येतील. स्पर्धेसाठीचे तुमचे हे व्हिडिओ 7720096038 या नंबरवर पाठवा आणि मोठ्या संख्येने सहभागी होण्याच आवाहन टीम सिंधुदुर्ग लाईव्ह आणि लुपिन फाऊंडेशनकडून करण्यात आलंय.