*कोंकण Express*
*ज्यांनी प्राथमिक शिक्षण देऊन घडवले, त्यांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्यच*
*श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचे प्रतिपादन*
*दिनांक २९/०२/२०२४ रोजी विद्यार्थी, शिक्षक,व्यवस्थापन यांच्या वतीने, सौ वर्षा वामन करंबेळकर यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात माजी विद्यार्थी म्हणून माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांची उपस्थिती,
व्यासपीठावर उपस्थित श्री व सौ वर्षा वामन करंबेळकर, सौ राणे मॅडम, परमहंस बाबा भालचंद्र महाराज संस्थान चे व्यवस्थापक विजय केळुसकर, भास्कर गावडे बुवा,
*शाळा नंबर ३चे माजी विद्यार्थी आणि माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले,
*माजी विद्यार्थी म्हणून राजेंद्र मनोहर पेडणेकर उपस्थित होते यावेळी त्यांनी १९७६/७७ च्या बॅच च्या वतीने विजय केळुसकर यांच्या हस्ते भास्कर गावडे यांच्या उपस्थितीत शाळा नंबर ३ च्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ वर्षा वामन करंबेळकर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले,
*आम्ही या शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंत प्राथमिक शिक्षण घेतले, आणि आज माझ्या बरोबर त्यावेळी शिक्षण घेतलेले माझे सर्व सवंगडी संजय मालंडकर, शरद मुसळे, साधना आळवे, सविता वाळके आम्ही सर्व च आज आपआपल्या क्षेत्रात कार्यरत आहोत,असे राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी प्रतिपादन केले,
*माजी विद्यार्थी म्हणून आज मला आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अलका वामन करंबेळकर यांना सन्मानित करण्याचे भाग्य लाभले, असेही ते म्हणाले,