ओंकार कलामंचाकडून राष्ट्रीय एकोपा जपण्यासाठी सुरू असलेले काम कौतुकास्पद

ओंकार कलामंचाकडून राष्ट्रीय एकोपा जपण्यासाठी सुरू असलेले काम कौतुकास्पद

*कोंकण Express*

*ओंकार कलामंचाकडून राष्ट्रीय एकोपा जपण्यासाठी सुरू असलेले काम कौतुकास्पद…*

*हेमंत निकम; जल्लोष राम लल्लाचा कार्यक्रमातील विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

अयोध्या सोहळ्याच्या पार्श्वभूमिवर युवाईला प्रेरीत करणारे कार्यक्रम आयोजित करुन सावंतवाडीच्या ओंकार कलामंचाने राष्ट्रीय एकोपा जपण्याचा प्रयत्न केला, त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे मत सावंतवाडी प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी आज येथे व्यक्त केले.
दरम्यान विविध स्पर्धांच्या माध्यमातून मोबाईलच्या आहारी गेलेली तरुण पिढी आता पुढे येणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजात काम करणार्‍या विविध संस्था संघटनांनी आता अशा प्रकारचे उपक्रम घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. ओंकार कलामंचाच्या माध्यमातून आयोजित जल्लोष रामलल्लाचा या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमिवर आयोजित रिल्स वेशभुषा आणि रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन आज येथिल महालक्ष्मी तथास्तू मॉल मध्ये करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना निकम बोलत होते.
यावेळी आंतरराष्ट्रीय नेमबाजीचे प्रशिक्षक अ‍ॅड. विक्रम भांगले, सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, बांधकाम व्यावसायिक दादा नगनुर, मॉलचे संचालक कांता कोंडल्याळ, विनायक कोंडल्याळ, ओंकार कलामंचाचे अध्यक्ष अमोल टेंबकर उपस्थित होते.
यावेळी श्री. साळुुंखे म्हणाले, या ठिकाणी ओंकार कलामंचाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. नवोदीत मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे नेण्यासाठी त्यांच्या पाठीशी राहणे काळाची गरज आहे. यावेळी श्री. भांगले यांनी उपस्थित स्पर्धक व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या अशा प्रकारच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेवून विद्यार्थ्यानी आपल्या जीवनात यशस्वी व्हावे असे त्यांनी सांगितले.
यावेळी रिल्स स्पर्धेतील साईश गावडे, पार्थ सावंत, केतन कुलकर्णी, यत्वेश राऊळ, वेशभुषा स्पर्धेतील काव्या गावडे, श्रावणी आरोंदेकर, क्षमिका आरोंदेकर, गौरव केळणेकर, रांगोळी स्पर्धेतील सायली भैरे, पुर्वा चांदरकर, जेसिता गोम्स, स्वरा हरम आदी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी कोंडल्याळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी सचिन कुलकर्णी, गणेश जाधव, प्रवीण गावडे, दिपज्योती कोंडल्याळ, रंजना कोंडल्याळ, कांता कोंडल्याळ, वेलांकनी गोम्स, जानू पाटील, ओंकार कलामंचचे पदाधिकारी हेमंत पांगम, सचिन मोरजकर, चैतन्य सावंत, शुभम सावंत, भुवन नाईक, नितेश देसाई आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!